सायबर फ्राॅडमधून गेलेले साडेतीन लाख रुपये मिळाले परत

MHLive24 टीम, 30 जुलै 2021 :-  सायबर क्राईमसंबंधी वेळीच तक्रार केली, तर सायबर फ्राॅडमध्ये गेलेले पैसे पोलिसांच्या तत्परतेमुळे परत मिळू शकतात. पुण्यातील नागरिकाला पोलिसांच्या या कार्यक्षमतेचा प्रत्यय आला.

तक्रार आणि कारवाई वेळीच होणे आवश्यक :- पुण्यातील एका नागरिकाला सायबर फ्रॉडमधून गेलेले 3 लाख 57 हजार रुपये परत मिळाले आहेत. पुणे सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे हे पैसे परत मिळाले असून वेळेत तक्रार करणे आणि पोलिसांनी वेळेत कारवाई करणे, या दोन्ही गोष्टी शक्य झाल्या, तर सायबर फ्रॉडमुळे गेलेले पैसे परत मिळू शकतात, हेदेखील यातून सिद्ध झाले.

काय होतं प्रकरण ? :- काही दिवसांपूर्वी तक्रारदाराला एक फोन आला. जुनं क्रेटिड कार्ड बंद करून नवं घेतलं, तर रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील, असं त्यांना सांगण्यात आलं. ही ऑफर चांगली वाटल्याने त्या व्यक्तीनं एसबीआयचं क्रेडिट कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला. हे कार्ड बंद करण्यासाठी ऑनलाईन लुटारूने त्याला कार्डचे तपशील मागितले.

Advertisement

या व्यक्तीने ते तपशील दिल्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्या बँक अकाऊंटवरून तीन लाख 66 हजार रुपये गायब झाले. 14 जुलैला ही घटना घडल्यानंतर तातडीने या व्यक्तीने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली.

असे मिळाले पैसे परत :- ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं एसबीआयच्या केंद्रीय कार्यालयाला संपर्क साधत आलेल्या तक्रारीची माहिती दिली. संबंधित व्यवहार हा फ्रॉड असल्याचं सांगत अधिकाऱ्यांना त्याविषयी माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हा व्यवहार रद्द केला आणि ज्या खात्यात हे पैसे जमा झाले होते, त्या खात्यातून वळते करून पुन्हा फिर्यादीच्या खात्यात जमा केले.

पोलिसांनी केलं आवाहन :- अनेकदा आवाहन करूनही नागरिक आपल्या बँक खात्याविषयीची महत्त्वाची माहिती ऑनलाईन चोरांना देत असतात. नागरिकांनी सतर्कता बाळगणं आणि कुठलेही तपशील फोनवरून न देणं ही खबरदारी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker