Mhlive24 टीम, 2 ऑक्टोबर 2020 :- कोरोना व्हायरसमुळे यंदाची IPL भारताबाहेर म्हणजेच संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येत आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत UAEत ही स्पर्धा होत आहे. सध्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे कि यंदा बाजी कोण मारणार. आता याबाबत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी भाकीत केले आहे. त्यांनी म्हटलं की, ‘विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुर आयपीएलचा 12 वर्षाचा दुष्काळ संपवून या वेळी जेतेपद जिंकू शकते. बंगळुरूचा संघ ज्या प्रकारे दिसत आहे, तो या विजेतेपदाचा दावेदार आहे.’
वेंगसरकर म्हणाले की, ‘या टी-२० स्वरूपाच्या स्पर्धेत सर्वात भक्कम दावेदार कोण हे सांगणे कठीण आहे. पण मी म्हणेन की यावेळी बंगळुरू जिंकेल, कारण त्यांनी अद्याप आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकलेले नाही. कोहली, डिव्हिलियर्स, युझवेंद्र चहल चांगली कामगिरी करतील. संघात बरेच चांगले खेळाडू आहेत.
पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे तो या स्पर्धेत पुढे कसा खेळतो यात मला रस आहे.’ युएईच्या परिस्थितीबाबत माजी कर्णधार म्हणाले की, ‘युएई मधील हवामान दमट आहे. भारतात तुम्ही १०-१२ ठिकाणी आयपीएल खेळता आणि तिथे तुम्ही फक्त तीन ठिकाणी खेळत आहात. त्यामुळे खेळपट्या बदलू शकतात. हे पाहणं मनोरंजक असेल’.
दरम्यान आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीची आयपीएलमधील कामगिरी फलंदाज म्हणून उत्कृष्ट आहे. पण, ही उत्कृष्ट कामगिरी त्याला आयपीएल संघाचा कर्णधार म्हणून अजून पर्यंत करता आलेली नाही.
त्याने आरसीबीचे 110 सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यातील 49 सामन्यात विजय तर 55 सामन्यात पराभव पत्करला आहे. चार सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे कोहलीचे विन पर्सेंटेज 47.16 असे साधारणच राहिले आहे.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर