‘या’ पैलवानाची नव्या व्यवसायात झेप

MHLive24 टीम, 27 जुलै 2021 :- बेलसर (ता. पुरंदर) येथील विशाल उर्फ भाऊसाहेब जगताप पैलवान आहेत. त्याचबरोबर त्यांचा वडिलोपार्जित हॉटेल व्यवसाय आहे. कोरोना काळात हा व्यवसाय संकटात सापडला.

त्यामुळे विशाल यांनी मुदगल (मोगरी) बनविण्याचा निर्णय घेतला. कुस्ती क्षेत्रातील मित्रांच्या मदतीने मुदगलीची विक्री करून नव्या व्यवसायाची उभारणी केली.

मागणीमुळे व्यवसायात पदार्पण :- व्यायामाला प्रोत्साहन मिळण्यासाठी विशाल यांनी हॉटेलवर मुदगल विक्रीसाठी ठेवली. अनेकांनी त्याची मागणी केली. त्याप्रमाणे ते मुदगलची निर्मिती करत गेले.

Advertisement

काही दिवसातच विक्रमी विक्री झाल्यानंतर त्यांनी एका कॉलेजसमोर मुलांसाठी रस्त्यावर स्टॉल लावला. तिथेही उत्तम प्रतिसाद मिळाला. यासाठी त्यांना त्यांचे मित्र जाबीर मुजावर साथ मिळाली.

मुदगल फिरवणे हा एक व्यायाम प्रकार :- मल्लविद्येत मुदगल/मोगरी फिरवणे हा एक व्यायामप्रकार महत्वाचा मानला जातो. मुदगल अथवा मोगरी तसेच काही ठिकाणी गदा फिरवणे असेही याचे उच्चार पाहायला मिळतात. मुदगल ही मुळात युद्धशास्त्रातील शस्त्र होय. फार दूरवर न जाता शिवकालीन युद्धशास्त्रात जो गुर्ज वापरला जात असे.

तो गुर्ज म्हणजे मोगरीचे रूप होय. फरक इतकाच, की गुर्ज पोलादी असून त्याच्या पुढे पोलादी व धारदार पाकळ्या असतात. समोरासमोर केल्या जाणाऱ्या हातघाईच्या युद्धात प्रतिपक्षाच्या पायदळाच्या डोक्यावर असणारे शिरस्त्राण अर्थात हेल्मेट फोडणे हा या शस्त्राचा प्रमुख उपयोग होय.

Advertisement

शिवकाळात गावोगावी असणाऱ्या तालमी म्हणजे जणू युद्ध प्रशिक्षण केंद्रे असायची. यात जवान कुस्ती व इतर युद्धाला पूरक व्यायामप्रकार करायचे व त्यातील लाकडी मोगरी फिरवून गुर्जाचा अभ्यास करायचे.

काय म्हणतात विशाल ? :- विशाल जगताप यांनी सांगितले, “आजवर काम करत असताना जो आनंद मिळाला नाही, तो मुदगलची निर्मिती व विक्रीतून मिळाला. यामुळे अनेक पहिलवान आणि वस्तादांशी संपर्क येतो. तरुण पिढी बलशाली करण्यासाठी मी खारीचा वाटा उचलत आहे, याचे मोठे समाधान आहे.”

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker