यावेळी ‘अशी’ होणार जनगणना, देशात प्रथमच राबवला जाणार ‘असा’ प्रोजेक्ट

MHLive24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- केंद्रीय गृह मंत्रालयाने लोकसभेत सांगितले की, 2021 च्या जनगणनेचा अभ्यास या वर्षी पूर्णपणे डिजिटल होणार आहे. जनमोजणीची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने केली जाईल अशी ही पहिलीच वेळ असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला सांगितले की, जातीची आकडेवारी जाहीर करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

1860 च्या दशकात जनगणना प्रक्रिया सुरू झाल्यापासून ही 16 वी जनगणना असणार आहे. गृह मंत्रालयाने सांगितले की 2021 ची जनगणना मोबाईल फोन अॅपद्वारे केली जाईल. शालेय शिक्षक डेटा गोळा करण्यासाठी त्याचा वापर करतील.

जनगणना पोर्टलच्या मदतीने, वैयक्तिक डेटाचे निरीक्षण आणि व्यवस्थापन केले जाईल. जनगणना फॉर्म घरी उपलब्ध सुविधा, पिण्याचे पाणी आणि विजेचे स्त्रोत, व्यवसाय आणि कुटुंबातील सदस्यांद्वारे बोलल्या जाणाऱ्या भाषा याबद्दल विचारू शकते. प्रत्येक व्यक्तीचा डेटा जनगणना कायदा 1948 अंतर्गत नोंदवला जाईल आणि कोणत्याही प्रकारे सार्वजनिक केला जाणार नाही.

Advertisement

थेट मोबाईल फोनमध्ये डेटा रेकॉर्ड केल्याने डेटा संकलन आणि त्यानंतरच्या विश्लेषणाच्या प्रक्रियेला गती मिळेल. जनगणना फक्त लोकांची मोजणी करत नाही तर सर्व तपशील यात आहे. त्याच्या डेटाच्या आधारावर, राज्य आणि केंद्र सरकार त्यांचे पॉलिसी बनवते. संपूर्ण जनगणना 16 भाषांमध्ये केली जाईल. दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. जनगणनेत एकूण 31 लाख कर्मचारी सहभागी होतील.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker