वडापावच्या किंमतीत मिळणाऱ्या ‘ह्या’ शेअरने वर्षभरात मिळवून दिले ६० लाख रुपये

MHLive24 टीम, 27 जुलै 2021 :- बिहार स्थित रिटेलर कंपनीने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी अशी उड्डाण घेतली की या काळात गुंतवणूकदारांचे १ लाख रुपये जवळपास ३७ लाख झाले. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, आदित्य व्हिजनच्या शेअर्समध्ये अवघ्या एका वर्षात ३२१४ टक्के वाढ झाली आहे.

८ जुलै, २०२० रोजी, बीएसई वर आदित्य व्हिजनच्या एका शेअर्सची किंमत २० .८६ रुपये होती आणि दोन दिवसांपूर्वी मुंबई शेअर बाजारात आदित्य व्हिजनचा शेअर १,२२५.६५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करत होता.

एका वर्षात केले १ लाखाचे ६० लाख रुपये :- इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या रिटेल व्यवसायातील आदित्य व्हिजन या कंपनीने फक्त वर्षभरात गुंतवणुकदारांना रंकाचा राव बनवला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास ६० लाख रुपये झाले आहेत.

Advertisement

आदित्य व्हिजनने मागील १२ महिन्यात ६,०२५ टक्के परतावा दिला आहे. ८ जुलै २०२० ला मुंबई शेअर बाजारात आदित्य व्हिजनच्या एका शेअरची किंमत २०.८६ रुपये प्रति शेअर इतकी होती. आज मुंबई शेअर बाजारात आदित्य व्हिजनचा शेअर १,२२५.६५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे.

कंपनीचा विस्तार :- आदित्य व्हिजन विस्ताराच्या योजना आखते आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनी झारखंडमध्ये १२ ते १५ स्टोअर सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर एक वर्षाने उत्तर प्रदेशचे पूर्व भागात, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये स्टोअर सुरू करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

मार्चमध्ये २०२०-२१ हे आर्थिक वर्षे सरताना आदित्य व्हिजनचा महसूल ५.९ टक्क्यांनी घटून ९०६.८८ कोटी रुपयांवर आला होता. तर त्याआधीच्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल ९६३.७१ कोटी रुपये इतका होता.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker