Cars Discount :  सणांच्या (festivals) दृष्टीने ऑक्टोबर महिना खूप व्यस्त असणार आहे. अनेकजण दिवाळीत (Diwali) स्वत:साठी नवीन कार घेण्याचा विचार करतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, सप्टेंबर महिन्यात अनेक मोठ्या कंपन्या त्यांच्या कारवर बंपर डिस्काउंट (bumper discounts) देत आहेत. या यादीत कोणती कार्स समाविष्ट आहेत ते जाणून घ्या.

Maruti Suzuki Alto

मारुतीच्या गाड्या गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. या महिन्यात, Alto, Alto 800 आणि Alto K10 च्या दोन व्हेरियंटवर मारुती बंपर सूट देत आहे. कंपनी Alto 800 AC पेट्रोल व्हर्जनवर 10,000 रुपयांची रोख सूट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि मॅन्युअल व्हर्जनवर 10,000 रुपये रोख सूट आणि Alto K10 वर रुपये 15,000 एक्सचेंज बोनस देखील देत आहे.

Hyundai Grand i10

Nios Hyundai ग्रँड i10 Nios 1.0 टर्बो व्हर्जनवर रु. 3,000 ची कॉर्पोरेट सूट देत आहे आणि रु. 35,000 चे कॅश डिस्काउंट आणि रु. 10,000 चे एक्सचेंज बोनस देत आहे. याशिवाय ग्रँड i10 Nios च्या CNG व्हेरियंटवर 10,000 रुपये रोख सूट, 10,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपये कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे.

Grand i10 Nios

1.2 पेट्रोल व्हेरियंटवर 10,000 रुपयांची रोख सूट, एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. Renault Triber कंपनी आपल्या कार रेनॉल्ट ट्रायबरवर 50,000 रुपयांची ऑफर देत आहे. Renault India Triber वर 15,000 रुपयांची रोख सवलत आणि 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील मिळत आहे.