Fixed Deposit : ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक बँका सध्या आपले व्याजदर वाढवत आहेत. अशातच मागच्या काही दिवसात अनेक बॅंकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केलेली आहे.

FD मध्ये गुंतवणूक करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यात गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित असते आणि परतावाही आधीच ठरलेला असतो.

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेस पॉईंटची वाढ केली आहे, त्यानंतर अनेक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जाच्या व्याजात वाढ केली आहे.

यासोबतच आता ग्राहकांना बचत खात्यात पैसे जमा करण्यावर आणि एफडी करण्यावरही फायदा मिळणार आहे. कारण अनेक बँकांनी दोन्हीवर व्याजदर वाढवले ​​आहेत. कोणत्या बँकेत तुम्हाला किती फायदा होईल ते घ्या जाणून

डीबीएस बँक

सिंगापूरच्या DBS बँकेने फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात 10 ते 50 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. नवीन व्याजदर 9 जून 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. हे दर 2 कोटींपेक्षा कमी एफडीवर लागू करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या कालावधीच्या FD वर 5 ते 6 टक्के व्याजदर असतो.

सेंट्रल बँक

ऑफ इंडिया बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँक सेंट्रल बँक ऑफ इंडियानेही मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, किमान व्याज दर 2.75% आणि कमाल व्याज दर 5.60% आहे. त्याच वेळी, 2 कोटींहून अधिक गुंतवणुकीवरील व्याज दर 3% आणि कमाल 4.30% झाला आहे.

फेडरल बँक

खासगी क्षेत्रातील बँक फेडरल बँकेने आपल्या बचत खात्याच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँका त्यांच्या ग्राहकांच्या बचतीवर रेपो दराच्या आधारे परतावा देतात. रिझर्व्ह बँकेने रेपो दर 4.40% वरून 4.90% केला आहे. 5 कोटींपेक्षा कमी रकमेसाठी, रेपो दरापेक्षा 2.15% कमी म्हणजे 2.75% व्याजदर आहे.

कोटक महिंद्राने बचत खात्यांचे व्याजदरही वाढवले ​​आहेत. हे नवे दर १३ जूनपासून लागू होतील. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 50 लाखांपर्यंतच्या ठेवींवर मिळणारे व्याजदर 3.50 टक्क्यांवर गेले आहेत. यापेक्षा जास्त रकमेवर मिळणारे व्याज ४ टक्के असेल.

इतर बँकांमध्येही दर वाढले आहेत

पंजाब अँड सिंध बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ओव्हरसीज बँकेसह अनेक वित्तीय संस्थांनी बचत आणि मुदत ठेवींवरील व्याजात वाढ केली आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की वाढत्या व्याजामुळे परतावा चांगला मिळत आहे, परंतु कर्ज घेणे महाग होत आहे.