Mhlive24 टीम, 24 ऑक्टोबर 2020 :- जगभरात कोरोनाचा धुमाकूळ घातला आहे. जगभरातील अर्थव्यवस्था शिथिल झालते. सर्वांचे लक्ष लशीकडे लागले आहे. आता भारतात लस कधी येणार आणि किती येणार आणि ती कुणाला दिली जाणार याबाबत सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

अनेक राज्यांनी मोफत लसीची घोषणा केली आहे. परंतु आता मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोफत लस कुणाला द्यायची हे मोदी सरकार ठरवणार आहे. मोदी सरकारने देशव्यापी कोव्हिड 19 लशीकरण कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. असं सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. केंद्र सरकार अशा 30 कोटी लोकांना मोफत लस देणार आहे. या लोकांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. जुलै 2021 पर्यंत 25 कोटी जनतेला लस देण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारचं आहे.

असे असणार नियोजन :- 30 कोटी लोकांचे चार गट तयार करण्यात आले आहेत. सर्वात आधी डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी, नर्सेस आणि आशा वर्कर्स यांना लस दिली जाईल. अशा एक कोटी लोकांना ही लस दिली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात महापालिका कर्मचारी, पोलीस अशा 2 कोटी फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाईल. त्यानंतर 50 वयापेक्षा जास्त वय असलेल्या सुमारे 26 कोटी सर्वसामान्य नागरिकांना लस दिली जाईल.

तर एक कोटी लोक असे असतील ज्यांचं वय 50 पेक्षा कमी आहे, मात्र त्यांना इतर गंभीर आजार आहेत आणि देखभालीची गरज आहे. अशा लोकांची नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत यादी तयार करण्याच्या सूचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology