Fast charging electric scooter : काय सांगता ! ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर आता होणार अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण चार्ज

MHLive24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- सध्या इलेक्ट्रिक वाहनाकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. वाढते इंधनाच्या किमती पाहता लोक त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकींची बाजारपेठेत तीव्र स्पर्धा निर्माण झाली असून ती सातत्याने वाढत आहे.(Fast charging electric scooter)

दररोज नवनवीन स्टार्ट-अप्स त्यांच्या शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली घेऊन येत आहेत जे एका चार्जमध्ये लांबचे अंतर कापतात.

पण Hero MotoCorp ने असे काम केले आहे जे खूप फायदेशीर ठरणार आहे. Hero ने बेंगळुरू स्थित Log 9 Materials सोबत भागीदारी केली आहे. हे स्टार्टअप हीरोच्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॅटरी पॅक बसवणार आहे.

Advertisement

Log9 ची RapidX बॅटरी बसवल्यानंतर हिरो इलेक्ट्रिक दुचाकी 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतात. हिरोने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, Log9 ने बॅटरी तयार करण्यासाठी सेल-टू-पॅक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

बॅटरी चार्जिंग 9 पटीने जलद होईल

कंपनीचा दावा आहे की बॅटरीचे चार्जिंग 9 पट वेगाने होईल, तिची कार्यक्षमता देखील 9 पटीने वाढेल, बॅटरीचे आयुष्य देखील 9 पट वाढेल. Log9 ने Amazon, Shadowfax, Delivery, Flipkart आणि Bikemania यांसारख्या फ्लीट ऑपरेटर्ससोबत पायलट प्रोजेक्ट म्हणून RapidX बॅटरीची चाचणी केली आहे.

Advertisement

या बॅटरीचे आयुष्य 10 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ती खूप चांगली आहे कारण या बॅटरीला आग लागत नाही. तापमान खूप वाढले तरी या बॅटरीजमध्ये फरक पडत नाही, याशिवाय कंपनीने या बॅटरीची वेगवेगळ्या सीझननुसार चाचणी केली आहे.

सध्या व्यावसायिक वापरासाठी

हिरो इलेक्ट्रिक भारतीय बाजारात NYX इलेक्ट्रिक स्कूटर विकत आहे. ही स्कूटर सध्या व्यावसायिक वापरासाठी विकली जात असून एका चार्जवर ती 210 किमी चालवता येते.

Advertisement

या ई-स्कूटरचे अनेक प्रकार बाजारात विकले जात आहेत आणि विशेषत: फूड डिलिव्हरी कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. हिरो इलेक्ट्रिकचे म्हणणे आहे की, कंपन्या त्यांच्या गरजेनुसार इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बदल करू शकतात, ज्यामध्ये समोर एक बकेट आणि मागे एक मोठा बॉक्स असेल.

इलेक्ट्रिक मोटर पर्याय

स्कूटर 600 किंवा 1300 वॅटच्या इलेक्ट्रिक मोटर्सच्या निवडीसह येते जी प्रत्येकी 51.2 वॅट किंवा 30 AH च्या तीन लिथियम-आयन बॅटरीसह येतात.

Advertisement

हीरो इलेक्ट्रिकच्या या स्कूटरमध्ये स्कूटर डायग्नोस्टिक सोल्यूशन्सशिवाय स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि सर्वोत्तम रिमोट सर्व्हिलन्स यासारखी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

ही ई-स्कूटर तीन प्रकारांमध्ये सादर केली गेली आहे – LI, LI ER आणि HS500 ER . यांची प्रारंभिक किंमत एक्स-शोरूम किंमत दिल्लीमध्ये 63,900 रुपये आहे, ही किंमत टॉप मॉडेलसाठी 79,900 रुपयांपर्यंत जाते.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker