‘या ‘निर्णयाने देशमुख यांच्या सीबीआय चाैकशीचा मार्ग मोकळा

MHLive24 टीम, 23 जुलै 2021 :-  मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता.

पोलिस अधिकार-यांच्या बदल्या, सचिन वाझे याला सेवेत पुन्हा घेण्याचा निर्णय आदीबाबत सीबीआयने तपास सुरू केला होता; परंतु त्याला राज्य सरकार आणि देशमुख यांनी आव्हान दिले होते. याबाबतच्या दोन्ही याचिका न्यायालयाने फेटाळल्या. त्यामुळे राज्य सरकार आणि देशमुख यांना चांगलीच चपराक बसली आहे.

याचिका फेटाळल्या :- देशमुख आणि राज्य सरकारने सीबीआय आपली कार्यकक्षा ओलांडत असून या चाैकशीला आव्हान देणा-या याचिका दाखल केल्या होत्या. या दोन्ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे आता सीबीआय देशमुख यांच्या आरोपाबाबत सर्व अंगांनी तपास करू शकेल.

Advertisement

आदेशाला स्थगितीस नकार :- न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने निकालपत्र जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी या निकालाला दोन आठवड्याची स्थगिती द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केली; मात्र साॅलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारची मागणी अमान्य केली. निकाल येईपर्यंत कागदपत्रे न मागण्याची हमी सीबीआयने दिलेली हमीही रद्द करण्यात आली.

सीबीआयक़डून आरोपाचे खंडन :- सीबीआयने देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून गुन्हा दाखल केला आहे. याविरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. सीबीआय जाणीवपूर्वक, राजकीय हेतूने आरोप करत आहे आणि. कायदेशीर तरतुदींचे पालन करत नाही, असा युक्तिवाद देशमुख यांच्या वतीने करण्यात आला होता.

राज्य सरकारनेदेखील या फिर्यादीतील दोन आक्षेपार्ह परिच्छेद वगळण्यासाठी याचिका केली होती. सीबीआय पोलिस बदल्या आणि फोन टॅपिंग प्रकरणात हस्तक्षेप करत आहे असा दावा सरकारकडून करण्यात आला होता. सीबीआयने दोन्ही आरोपांचे खंडन केले असून तपास करण्याचा अधिकार आहे असे म्हटले आहे.

Advertisement

न्यायालयाची सूचना :- सीबीआयने या प्रकरणात सर्व संबंधितांचा तपास करायला हवा, केवळ देशमुख यांचीच चौकशी करू नये, आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला नियुक्त करणा-या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांबाबतही प्रश्न उपस्थित केले होते.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker