Discontinued Car : लोकसंख्येच्या दृष्टीने भारत सर्वात मोठा देश आहे. याचबरोबर ऑटो सेक्टर मध्ये भारतीय बाजारपेठ भरपूर मोठी आहे. ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी अनेक ऑटो कंपन्या प्रयत्न करतं असतात.

दरम्यान अशातच ऑटो सेक्टर मधून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. वास्तविक ह्युंदाई मोटरला भारतात मजबूत ओळख मिळवून देणारी सॅन्ट्रो हॅचबॅक बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

वाहनांच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ आणि एंट्री सेगमेंटच्या कार खरेदीदारांकडून कमी होत चाललेली मागणी यामुळे Hyundai Motor India ला ही हॅचबॅक बंद करणे भाग पडले आहे.

कंपनीने ही कार 2018 मध्ये 3.9 लाख ते 5.5 लाख रुपयांच्या किमतीत पुन्हा लाँच केली होती. आता या 4 वर्षांत या वाहनाची किंमत सुमारे 20-30 टक्क्यांनी वाढून 5.7 लाखांवरून 7 लाख एक्स-शोरूमवर पोहोचली आहे.

गेल्या सहा महिन्यांत दर महिन्याला कारच्या फक्त 1500-2000 युनिट्सची विक्री होत होती, त्यानंतर आता दक्षिण कोरियाच्या कार कंपनीने ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अहवालानुसार, सँट्रोच्या शेवटच्या युनिटचे उत्पादन गेल्या आठवड्यात झाले. सँट्रोचे सध्याचे मॉडेल जुन्या मॉडेलप्रमाणेच यश मिळवण्यात अपयशी ठरले आहे.

SUV आणि प्रीमियम हॅचबॅकच्या वाढत्या मागणीसह भारतीय प्रवासी वाहन बाजाराचा वेगवान विकास हे देखील याचे एक कारण असू शकते.

इंजिन सँट्रोमध्ये 1.1-लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 68hp पॉवर आणि 99Nm टॉर्क जनरेट करते. त्याच वेळी, कारचा CNG पर्याय 58hp पॉवर आणि 84Nm टॉर्क जनरेट करतो.

पेट्रोल इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध आहे. दुसरीकडे, सीएनजी मॉडेल 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.

वैशिष्ट्ये व्हेरियंट आणि इंधन प्रकारावर अवलंबून, सॅन्ट्रोचे मायलेज पेट्रोलमध्ये 20.3 kmpl आणि CNG मध्ये 30.48 kmpl आहे.

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात Android Auto, Apple CarPlay आणि MirrorLink कनेक्टिव्हिटीसाठी सपोर्ट असलेली 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रियर पार्किंग कॅमेरा, सेन्सर्स, रिअर एसी व्हेंट्स, सर्व प्रकारांमध्ये ड्रायव्हर साइड एअरबॅग, EBD सह ABS यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.