भाजपचा हा नेता म्हणतो, ‘राज ठाकरे यांचा मलाही फोन!’

MHLive24 टीम, 27 जुलै 2021 :- राज ठाकरे यांचा मलाही फोन आला होता. येत्या काही दिवसांत मी त्यांची भेट घेईन, असं माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगतिलं. मुनगंटीवार यांच्या या विधानाने भाजप-मनसे युतीच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.

मनसे-भाजप युती होण्यात गैर काय ? :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिकमधील भेटीनंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. राज मुनंगटीवार यांनी भाजप- मनसे युतीवर मोठं विधान केलं आहे.

भविष्यात आमची युती झाली तर त्यात गैर काय, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. समविचारी पक्ष एकत्र येत असतील, तर त्यात गैर काय, असा सवाल करून ते म्हणाले, की भविष्यात काँग्रेस आणि भाजप सोडून कोणीही एकत्र येऊ शकतो.

Advertisement

आॅगस्टमध्ये बैठक :- ॲागस्टच्या पहिल्या आठवड्यात सुधीर मुनगंटीवार हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या पार्किंग लॉटमध्ये ओझरती भेट झाली होती. त्याचवेळी राज यांनी परप्रांतीयांविषयी माझी नेमकी काय भूमिका आहे, याच्या क्लिप्स तुम्हाला मी पाठवतो, असे चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते.

त्यानुसार मनसेकडून या क्लिप्स पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या. त्यामुळे राज ठाकरे आगामी पालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी उत्सुक आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नाशिकच्या भेटीत नेमकं काय घडलं ? :- राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील नाशिकमधील भेट बऱ्याच प्रयत्नानंतर घडून आली होती. दोन्ही नेते पार्किंग लॉटमध्ये 15 मिनिटं बोलत उभे होते. त्यानंतर पाटील यांनी या भेटीचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला होता.

Advertisement

राज ठाकरे यांनी मला सांगितलं, की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाला. त्याची लिंकही ते मला पाठवणार आहेत. आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठं नेतृत्व आहे. राज ठाकरे यांच्याबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker