Things to keep in mind when buying a home : घर खरेदी करण्यापूर्वी तुम्ही ‘ह्या’ गोष्टी देखील पाहताय ना? अन्यथा होईल प्रचंड नुकसान

MHLive24 टीम, 21 सप्टेंबर 2021 :- जेव्हा लोक म्हणतात की ते एका घराच्या प्रेमात पडले आहेत, तेव्हा त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रेम आंधळे असते. घर खरेदी करणे ही कोणत्याही मध्यमवर्गीय माणसासाठी मोठी गुंतवणूक आहे आणि खूप भावनिक देखील आहे. जे एक अतिशय धोकादायक संयोजन आहे.( Things to keep in mind when buying a home)

जर तुम्हाला तुमची स्वतःची खरेदी करायची असेल तर घाई करू नका कारण त्याचे परिणाम खूपच भयंकर असू शकतात. कारण ही गुंतवणूक तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या कमाईच्या आसपास असते.

दुसरीकडे, घर विक्रेते देखील गुंतवणूकदारांच्या भावनांचा चुकीचा फायदा घेत आहेत. अशा परिस्थितीत, घर खरेदी करण्यापूर्वी, काही चुका अजिबात करू नका, ज्याचा तुम्हाला नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. यासाठी काय लक्षात ठेवावे ते या ठिकाणी जाणून घ्या 

Advertisement

१. बिल्डरबद्दल माहिती

नवीन स्कीममध्ये घर बुक करताना त्या बिल्डरबद्दल माहिती मिळवणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्या बिल्डरचे इतर प्रोजेक्ट कुठे आहेत, आधी त्याने कुठल्या कुठल्या ठिकाणी काम केले आहे, जुन्या प्रोजेक्टमध्ये काही गोंधळ झाला आहे का? ओनरशीप द्यायला उशीर झाला का? घरात बारीक-सारीक कामांमध्ये फिनिशिंग होते का?

या गोष्टींची नीट, खात्रीशीर माणसाकडून शहानिशा करूनच मग त्या स्कीममध्ये किंवा त्या बिल्डरबरोबर करार करायचा का नाही याचा निर्णय घेतला पाहिजे. आत्ताच्या त्या बिल्डरचे प्रोजेक्ट कितीही आकर्षक वाटत असले तरीही त्याच्या आधीच्या स्कीमबद्दल तितकेसे गुडवील नसेल तर त्या प्रोजेक्टमध्ये पैसे न गुंतवलेलेच आपल्या हिताचे असते.

Advertisement

२. घर ते ऑफिस अंतर

बऱ्याचदा काही स्कीम प्रचंड आकर्षक असतात पण त्या कधीकधी शहरापासून लांबच्या अंतरावर असू शकतात. याचा अर्थ ते आपल्या ऑफिसपासून जास्त अंतरावर असतात. सुरुवातीला जरी आपल्याला हे अंतर विशेष वाटले नाही, आपण रोज सहज प्रवास करू असे वाटले तरी ते प्रचंड थकवणारे असते हे आपण आधीच लक्षात घेतले पाहिजे.

रोज लांबच्या प्रवासाला लागणारा वेळ, त्यामुळे येणारा थकवा, पेट्रोलचा खर्च या सगळ्याचा हिशोब केला पाहिजे. एखादवेळेस तरूणपणी या प्रवासाचे काही वाटणार सुद्धा नाही पण वाढत्या वयाबरोबर याचा त्रास जास्त प्रमाणात जाणवू लागेल.

Advertisement

आपले घर जर आपल्या ऑफिसच्या जवळ असेल तर वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत होते आणि याशिवाय जास्त वेळ प्रवासात न गेल्यामुळे आपण सुद्धा फ्रेश राहतो. नवीन घराची निवड करताना, घर ते ऑफिस हे अंतर ध्यानात ठेवले पाहिजे.

३. शाळा, हॉस्पिटल, बसस्टाॅप, बाजार यापासून घराचे अंतर

शहरापेक्षा अधिक आकर्षक स्कीम या शहराबाहेर असतात. शहराबाहेर घरांची किंमत शहराच्या तुलनेत स्वस्त जाते. पण याचा मोठा तोटा हा असतो की तिथून हाकेच्या अंतरावर न चांगले दवाखाने असतात न बाजारपेठा. म्हणूनच घर घेताना घराजवळ चांगली शाळा, कॉलेज, डॉक्टर आहेत न याची खात्री करूनच घर बुक करायला हवे.

Advertisement

नाहीतर घरात वाचवलेले पैसे हे प्रवासात खर्च करण्याची वेळ येऊ शकते. घराजवळ मोठे बाजार नाही तरी आपल्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू, किराणा, औषधांचे दुकान हे जवळ आहे न हे बघितले पाहिजे. जरी आत्ता हे सगळे घराजवळ नसेल तरी तो परिसर डेव्हलपिंग आहे का?

नजीकच्या काळात तिथे या सोयी होण्याची शक्यता आहे का? याचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर घराजवळचा बसस्टाॅप कोणता आहे, ट्रेन स्टेशन किती अंतरावर आहे हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे ज्यामुळे आपला रोजचा प्रवास सुखकर होईल.

४. रीसेलची शक्यता

Advertisement

आपले स्वतःचे घर एकदा झाले की आपल्यावर ती विकायची वेळ येईल हा विचार काही घर बुक करतानाचा आपण करत नाही. पण आयुष्यात प्रॅक्टीकल असणे महत्वाचे असते. आपली किवा आपल्या जोडीदाराची दुसऱ्या शहरात बदली होऊ शकते, तुम्हाला दुसरीकडे अजून मोठा, जास्त प्रशस्त घर मिळू शकते आणि हे घर सोडायची वेळ येऊ शकते.

अशावेळेला घर परत विकले जाईल का? हा विचार घर घेण्याआधीच केलेला बरा असतो. यासाठी घराचे लोकेशन, आजूबाजूचा परिसर, सोसायटी या गोष्टींचा विचार केला पाहिजे.

उदाहरण द्यायचे झाले तर तुम्हाला कदाचित सोसायटीत स्विमिंग पूल असावा, जिम असावे असे वाटणार नाही पण तुमच्याकडून घर विकत घेणाऱ्यांसाठी या दोन महत्वाच्या गोष्टी असू शकतात. त्यामुळे घर घेताना अशाच पद्धतीने निवडावे की आपल्यावर ते विकायची वेळ आली तर ते दुसऱ्यांना सुद्धा पसंत पडेल.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker