Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

राजगडावर सापडला ‘चोर’ दरवाजा, सह्याद्री प्रतिष्ठानकडून दरवाजा पूर्ववत

Mhlive24 टीम, 24 डिसेंबर 2020 :छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात जास्त काळ वास्तव्य असणाऱ्या किल्ले राजगडावर बऱ्याच वर्षपासून लपलेला दरवाजा सापडला आहे.राजगड तालुका वेल्हे येथे पाली या राजमार्गावरील पाली दरवाजात हा दरवाजा अनेक वर्षांपासून बुजला गेला होता.सह्याद्री प्रतिष्ठानचा समूह या ठिकाणी गडभ्रमंती करण्यास आल्यानंतर हि बाब उघडकीस आली आहे.

Advertisement

हा दरवाजा परत पहिल्यासारखा करण्यात आल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली आहे.राजगड परिसरात आजही अनेक शिवकालीन वस्तू आणि वास्तूंचे दर्शन होत असते.

Advertisement

राजगडावरील स्थापत्य शास्र आजच्या बांधकामापुढे पण उठून दिसते. तिथे असणारी सुवेळा किंवा संजीवनी माची यांचे विहंगम दृश्य गडावरून दिसते असते. सह्याद्री प्रतिष्ठानचा समुह फिरायला आला असता त्यांना बुरुज परिसरात दगड दिसले.

Advertisement

त्यांनी ते दगड बाजूला केल्यानंतर त्यांना एक दरवाजा दिसला. राजगडावरील पाली दरवाजाच्या सुरक्षेसाठी बनवलेला हा चोर दरवाजा काळाच्या ओघात लुप्त झाला होता.

Advertisement

बुरुजावरील सात ते आठ मोठ्या दगडी व माती बाजूला केल्यानंतर ३ फूट उंचीचा आणि दोन फूट उंचीचा चोर दरवाजा पूर्ववत झाला.याप्रसंगी सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे उपस्थित होते.

Advertisement

किल्ले राजगड पुणे शहरापासून जवळ असल्यामुळे तिथे येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे.राजगडावर काम गडदुरुस्तीची कामे चालू होती पण कोरोनाकाळात निधी न मिळाल्यामुळे थांबली होती.महिला व पुरुषांसाठी स्वछतागृह,पर्यटक निवास्थान,शिवकालीन वस्तूंचे जतन करण्यासाठी संग्रहालय इत्यादी कामे चालू होती.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li