MHLive24 टीम, 26 डिसेंबर 2021 :- 2021 हे वर्ष आता संपणार आहे. डिसेंबरचे अवघे पाच दिवस उरले आहेत. आता आपण नवीन वर्ष 2022 मध्ये प्रवेश करणार आहोत.(Share Market)

सन 2021 मध्ये शेअरमार्केट विविध घटनानॆ नेहमीच उपडाऊन राहिले. परंतु या वर्षात असे काही शेअर आले कि ज्यांनी गुंतवणूकदारांना आयुष्यभरासाठी श्रीमंत करून टाकले.

सध्या शेअर मार्केट अप-डाऊन होत आहे. ओमोक्रॉनची धास्ती याला करणीभूत ठरत आहे. परंतु अशा परिस्थितीतही असा एक शेअर होत ज्याने मागील दीड महिन्यात गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करून दिली आहे.

सुप्रीमेक्स शाइन स्टील्स लि. चा शेअर सध्या ९.०३ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करत आहे. १ नोव्हेंबर २०२१ ला सुप्रीमेक्स शाइन स्टील्स लि. शेअर २.०७ रुपयांच्या किंमतीवर होता. म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य डिसेंबर महिन्यात ४.३ लाख रुपये झाले आहे.

गुंतवणूकीसाठी बरेच पर्याय आहेत. एफडी, पोस्ट ऑफिस योजना, बॉन्ड, सोने-चांदी, डिबेंचर्स आणि म्युच्युअल फंड आदी. पण शेअर बाजार सर्वाधिक परतावा देऊ शकेल. शेअर बाजार अशी जागा आहे जिथे तुमचे पैसे त्वरीत दुप्पट, तिप्पट किंवा इतर गुंतवणूकीच्या पर्यायांपेक्षा अधिक असू शकतात.

तथापि, शेअर बाजाराचे धोके देखील आहेत आणि इतर पर्यायांपेक्षा अधिक माहितीची यात आवश्यकता असते. परंतु जर एखाद्या गुंतवणूकदारास चांगला शेअर मिळाला तर केवळ एक शेअर भाग्य बदलू शकेल. असाच एक छोटा पॅकेट बडा धमाका केला आहे सुप्रीमेक्स शाइन स्टील्स लि. ने.

सुप्रीमेक्स शाइन स्टील्स लि. ने दिला जबरदस्त परतावा

१ नोव्हेंबर २०२१ ते २५ डिसेंबर २०२१ या जवळपास दीड महिन्यांच्या कालावधीत सुप्रीमेक्स शाइन स्टील्स लि. च्या शेअरने गुंतवणुकदारांना जवळपास ३३६ टक्क्यांचा दणदणीत परतावा दिला आहे.

या वर्षातील मधल्या काही महिन्यांमध्ये आलेल्या घसरणीला वगळून या शेअरने शानदार वाटचाल केली आहे. नोव्हेंबर महिन्यात या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य डिसेंबर महिन्यात ४.३ लाख रुपये झाले आहे. सुप्रीमेक्स शाइन स्टील्स लि. ची स्थापना २०११मध्ये झाली होती.

पेनी स्टॉक म्हणजे काय? जर तुम्ही गुंतवणूक करत असाल किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याबद्दल माहिती असायलाच हवी. येथे आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या स्टॉकला पेनी स्टॉक म्हणतात.

अत्यंत कमी किमतीचे शेअर्स

तथापि, पेनी स्टॉकची कोणतीही मानक व्याख्या नाही. परंतु पेनी स्टॉक्स अशा स्टॉक्स म्हणतात ज्याची किंमत खूपच कमी आहे. साधारणपणे 10 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या शेअर्सना पेनी स्टॉक म्हणतात. त्यांचे बाजार भांडवल देखील कमी आहे आणि ते एक्सचेंजेसवर बहुतेक तरल नसलेले असतात. हे बहुतांशी संशोधनाखालील स्टॉक्स असतात आणि बहुतेक गुंतवणूकदारांना त्यांची माहिती नसते.

रिस्क का आहे ?

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या कंपन्यांचे बाजार भांडवल खूपच कमी आहे. कंपनीचे बाजार भांडवल जितके जास्त तितके ते अधिक स्थिर असते. तर कमी बाजार भांडवल असलेली कंपनी अस्थिर असते. त्यांचा अंदाज लावणेही कठीण आहे. त्यामुळे त्यांना जास्त धोका असतो. तथापि, नवीन आणि कमी ज्ञानी गुंतवणूकदार त्यांच्यावर दावं लावतात.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup