Post office schemes: पोस्टाच्या ‘ह्या’ अनेक स्कीम तुम्हाला बनवतील श्रीमंत! जाणून घ्या पैसे डबल करणाऱ्या सर्व योजना एका क्लिकवर

MHLive24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- अनेक लोक गुंतवणुकीला प्राधान्य देतात. कोरोनाने गुंतवणूकचे महत्व पटवून दिले आहे. परंतु अनेकांना गुंतवणुकीत रिस्क नको असते.(Post office schemes)

यासाठी पोस्ट ऑफिस योजना चांगल्या आहेत. त्या झिरो रिस्कमध्ये चांगला परतावा देतात. पोस्ट ऑफिसची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावर सरकारी ग्यारंटी असते.

म्हणजेच, येथे रिस्क फॅक्टर खूप कमी आहे. आपण पोस्ट ऑफिसच्या सर्व बचत योजनांबद्दल माहिती घेऊयात ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे दुप्पट होतील. तसेच, या सर्व योजनांच्या व्याजदरांबद्दल जाणून घ्या.

Advertisement

1. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (TD) मध्ये 1 वर्ष ते 3 वर्षांपर्यंत सध्या 5.5% व्याज मिळत आहे. तुम्ही यामध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे सुमारे 13 वर्षांत दुप्पट होतील. त्याचप्रमाणे, तुम्हाला 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 6.7% व्याज मिळत आहे. या व्याजदराने पैसे गुंतवले तर तुमचे पैसे सुमारे 10.75 वर्षांत दुप्पट होतील.

2. पोस्ट ऑफिस बचत बँक खाते

Advertisement

तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिस बचत खात्यात ठेवल्यास, पैसे दुप्पट होण्यासाठी तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागेल. कारण यामध्ये फक्त 4.0 टक्के व्याज मिळते, म्हणजेच तुमचे पैसे 18 वर्षात दुप्पट होतील.

3. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट

सध्या तुम्हाला पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) वर 5.8% व्याज दिले जात आहे, त्यामुळे या व्याजदराने पैसे गुंतवले तर साधारण 12.41 वर्षात ते दुप्पट होईल.

Advertisement

4. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (MIS) वर सध्या 6.6% व्याज मिळत आहे, जर या व्याजदराने पैसे गुंतवले तर ते 10.91 वर्षात दुप्पट होईल.

5. पोस्ट ऑफिस सीनियर सिटिजंस सेविंग्स स्कीम

Advertisement

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वर सध्या 7.4% व्याज दिले जात आहे. या योजनेत तुमचे पैसे सुमारे 9.73 वर्षांत दुप्पट होतील.

6. पोस्ट ऑफिस पीपीएफ

पोस्ट ऑफिसच्या 15 वर्षांच्या पब्लिक प्रोविडेंट फंड ( (PPF) मद्धे सध्या 7.1% व्याज मिळत आहे. म्हणजेच, या दराने तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 10.14 वर्षे लागतील.

Advertisement

6. Post Office PPF

पोस्ट ऑफिस की 15 साल की पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) पर इस वक्त 7.1 परसेंट का ब्याज मिल रहा है. यानी इस रेट पर आपका पैसा डबल होने में करीब 10.14 साल का वक्त लगेगा.

7. पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खाते

Advertisement

पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी खाते योजनेवर सध्या सर्वाधिक 7.6 टक्के व्याज मिळत आहे. मुलींसाठी चालवल्या जात असलेल्या या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 9.47 वर्षे लागतील.

8. पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

सध्या पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर 6.8% व्याज दिले जात आहे. ही 5 वर्षांची बचत योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून आयकर देखील वाचवला जाऊ शकतो. जर या व्याजदराने पैसे गुंतवले गेले तर ते सुमारे 10.59 वर्षांत दुप्पट होईल.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker