सध्या LIC IPO बाबत आपण महत्वाची घडामोड घडत आहे. गुंतवणुकदार LIC IPO कडे लक्ष ठेवून आहेत. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या IPO ची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.

LIC IPO बद्दल मोठी बातमी समोर आली आहे, त्यामुळे जर तुम्हाला देखील स्वारस्य असेल तर आमची बातमी नक्की वाचा. LIC IPO मध्ये LIC च्या अँकर गुंतवणूकदारांचा कोटा सोमवारी (2 में) पूर्ण झाला.

एलआयसीने शेअर बाजारांना ही माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की 71 टक्के अँकर भाग गुंतवणूक म्युच्युअल फंडातून आली आहे.

LIC ने एकूण 123 अँकर गुंतवणूकदारांना सुमारे 5.93 कोटी शेअर्सचे वाटप केले. हे वाटप 949 रुपये प्रति शेअर दराने करण्यात आले.

अनेक बड्या परदेशी गुंतवणूकदारांनी एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केली. यामध्ये सिंगापूर सरकार, गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल, बीएनपी इन्व्हेस्टमेंट एलएलसी, सिंगापूरचे चलन प्राधिकरण आणि सोसायटी जनरल यांचा समावेश होता.

याशिवाय Invesco India आणि Cent Capital Fund ने देखील या IPO मध्ये गुंतवणूक केली आहे. या आयपीओमध्ये देशांतर्गत गुंतवणूकदारांनीही मोठी गुंतवणूक केली.

यामध्ये SBI म्युच्युअल फंड, ICICI प्रुडेन्शियल, SBI लाइफ इन्शुरन्स, L&T म्युच्युअल फंड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, UTI म्युच्युअल फंड, सुंदरम म्युच्युअल फंड, IDFC MF आणि बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स यांचा समावेश आहे.

LIC ने BSE ला सांगितले की, “एकूण वाटपांपैकी 4.21 कोटी शेअर्स 15 म्युच्युअल फंडांना वाटप करण्यात आले. बुधवार, 4 मे रोजी हा इश्यू इतर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल.

कंपनी या इश्यूद्वारे 21,000 कोटी रुपये उभारणार आहे. यापैकी 5,630 कोटी रुपये अँकर गुंतवणूकदाराकडून उभारले जात आहेत.

5.92 कोटी शेअर्स अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव होते. सेबीने सरकारला एलआयसीमधील 3.5 टक्के हिस्सा विकण्याची परवानगी दिली आहे.

याआधी सरकारला या कंपनीतील 5 टक्के हिस्सा विकायचा होता. मात्र, गेल्या काही महिन्यांतील परिस्थितीतील बदलानंतर (युक्रेनचे संकट, व्याजदरात वाढ) सरकारने इश्यूचा आकार कमी करण्याचा निर्णय घेतला.

सरकार ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे LIC मधील आपला हिस्सा विकत आहे. IPO च्या 10% पॉलिसीधारकांसाठी राखीव आहे.

0.7 टक्के कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 31.25 टक्के राखीव आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना प्रति शेअर 45 रुपये सूट मिळेल.

पॉलिसीधारकांसाठी 60 रुपयांची सूट आहे. या श्रेणींमधील शेअर्ससाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची बोली लावता येईल. याचा अर्थ असा की सवलतीनंतर 230 पर्यंत शेअर्ससाठी अर्ज करता येईल.