ग्रामीण भागातही पैसा कमावून देऊ शकतात ‘ह्या’ पाच बिझनेस आयडिया

MHLive24 टीम, 26 जुलै 2021 :- खेड्याकडे चला हा महात्मा गांधीजींनी दिलेला मूलमंत्र आजही तितकाच योग्य व कालसंगत आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र दररोज लोकांचे लोंढेच्या लोंढे शहराकडे वाहताना दिसतात.आज गावातून शहरात जाण्यासाठी ग्रामीण जनतेत चढाओढ लागली आहे. त्यामागील कारण हे शहरात जाऊन मौज-मजा करणे हे नसते, तर पोटाची खळगी भरण्यासाठी चाललेली ती धडपड असते.

खेड्यामध्ये जगणे दिवसेंदिवस असह्य होत चालले आहे. मूलभूत, पायाभूत सुविधांची वानवा, सततचा दुष्काळ, त्याचबरोबर नापिकी आणि शेतमालाचे ढासळलेले भाव ही या स्थलांतराची काही कारणे आहेत. परंतु, त्यापेक्षाही महत्त्वाचे कारण म्हणजे रोजगाराच्या संधींकडे बघण्याचा लोकांचा चुकीचा दृष्टिकोन. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात तुम्ही काय उद्योग करू शकता हे आपण पाहू.

१. दैनंदिन जीवनात लोकांना अनेक खाद्य वस्तूंची आवश्यकता असते. अश्या रोज लागणाऱ्या वस्तूंची गरज लक्षात घेऊन तुम्ही किराणा दुकान / किरकोळ स्टोअर चालू करू शकता. एका लहानशा गावात व्यवसाय चालवण्यासाठी आणि उत्पन्न मिळण्यासाठी हा चांगला मार्ग आहे. एकदा का लोकांना गावातच खरेदीची सवय लागली कि मग व्यवसाय मोठा व्हायला वेळ लागत नाही.

Advertisement

२. गावात आज पिण्याच्या स्वच्छ पाण्याची समस्या गहन होत चालली आहे. त्यामुळे पाणी रिफिल स्टेशन / मोबाईल व्हॅन हा एक चांगला व्यवसाय आहे. अश्या मोबाईल प्युरिफिकेशन व्हॅन सिस्टिम खरेदी करण्यासाठी कर्ज सुविधा पण उपलबद्ध आहे. ज्या गावांमधे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तिथे हा खरोखर फायदेशीर व्यवसाय आहे.

३. मोबाईल आज चैन न राहता गरजेचा झाला आहे. ग्रामीण भागात सुद्धा लोकांकडे सर्रास मोबाईल दिसून येतो. मोबाईल साठी लागणाऱ्या ऍक्सेसरीज, सिम कार्ड, रिचार्ज व्हाउचर्स आणि रिपेरिंग सर्विस यांची मागणी पण खूप वाढली आहे. हा व्यवसाय सुरु करायला गुंतवणूक कमी आणि फायदा जास्त आहे.

४. लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती, आइस्क्रीम सगळ्यांनाच आवडते. जर तुमच्या गावाच्या आसपास जवळ कुठे आइस्क्रीम शॉप नसेल तर तुम्ही आइस्क्रीम शॉप हा रिटेलिंग व्यवसाय यशस्वीरित्या प्रारंभ करू शकता. अनेक मोठ्या ब्रॅण्ड च्या फ्रँचायसी घेऊ शकता.

Advertisement

५. माणसाच्या मुलभूत गरजांपैकी एक म्हणजे अन्न, त्यात खवय्यांची कुठेच काही कमी नाही. त्यामुळे चवीने खाणारे कधी कमी होत नाही. त्यामुळे एखादं हॉटेल / स्टॉल सुरु करू शकता. अगदी चहा, भेळ, मिसळ, भजी, वडा पाव, तर्री वडा, सामोसे यासारख्या भरपूर खपणाऱ्या खाद्यपदार्थांचे हॉटेल सुरु करू शकता. पुढे जाऊन याचे रूपांतर मोठ्या हॉटेल मधे करून प्रगती करू शकता. तसे पहिले तर हॉटेल व्यवसायाला कधीच मरण नाही.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker