Interest rate on FD: ‘ह्या’ बँका FD वर देतायेत SBI पेक्षाही जास्त व्याज, जाणून घ्या 1 ते 5 वर्षांचे व्याजदर

MHLive24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- ज्यांना गुंतवणूक करायची आहे पण धोका पत्करायचा नाही त्यांच्यासाठी मुदत ठेव (FD) हा एक चांगला पर्याय आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांत एफडीवरील व्याजदरात लक्षणीय घट झाली आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास झाला आहे. पण आम्ही तुम्हाला अशाच काही बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या 1 ते 5 वर्षांपर्यंत FD वर सर्वाधिक व्याज देत आहेत.(Interest rate on FD)

SBI ने FD वर व्याज वाढवले आहे

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. ही वाढ रु. 2 कोटी आणि त्याहून अधिक रकमेच्या देशांतर्गत मोठ्या मुदत ठेवींवरील व्याजावर झाली आहे. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किरकोळ मुदत ठेवींच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.

Advertisement

हे नवीन FD व्याजदर 15 डिसेंबर 2021 पासून लागू झाले आहेत. बँकेने एफडी दरात 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. मात्र सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप 5 बँकांच्या यादीत एसबीआयचा समावेश नाही.

१ वर्षाची एफडी

इंडसइंड बँक – 6% पी.ए.
RBL बँक – 6% p.a.
DCB बँक – 5.55% p.a.
बंधन बँक – 5.50% p.a.
IDFC फर्स्ट बँक – 5.25% p.a.

Advertisement

२ वर्षाची एफडी

इंडसइंड बँक – 6% पी.ए.
RBL बँक – 6% p.a.
DCB बँक – 5.50% p.a.
बंधन बँक – 5.50% p.a.
अॅक्सिस बँक – 5.40% पी.ए.

३ वर्षाची एफडी

Advertisement

RBL बँक – 6.30% p.a.
इंडसइंड बँक – 6% p.a.
DCB बँक – 5.95% p.a.
IDFC फर्स्ट बँक – 5.75% p.a.
साउथ इंडियन बँक – 5.50 p.a.

५ वर्षाची एफडी

RBL बँक – 6.30% p.a.
IDFC फर्स्ट बँक – 6% p.a.
इंडसइंड बँक – 6% p.a.
DCB बँक – 5.95% p.a.
अॅक्सिस बँक – 5.75% p.a.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker