Delete this mobile apps : सावधान! तुमच्या फोनमध्ये असतील ‘हे’ अॅप्स तर लगेच करा डिलीट; अन्यथा…

MHLive24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- आजकाल प्रत्येकजण अँडॉईड मोबाईल वापरतो. विविध ऍप डाउनलोड करतो. जर तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल तर अॅप डाउनलोड करण्यापूर्वी अवश्य काळजी घ्या.(Delete this mobile apps)

कारण संशोधकांना संशोधनांती असे आढळून आले आहे की 300,000 हून अधिक वापरकर्त्यांनी बँकिंग ट्रोजन मालवेअर डाउनलोड केले आहेत. या व्हायरसने Google Play Store च्या सुरक्षिततेला देखील चकवा दिला आहे.

काही सिम्पल असणारे डाउनलोड करण्यायोग्य अॅप्स हे 4 प्रकारच्या मालवेअरने कव्हर आहेत, ज्यापैकी एक वापरकर्त्यांचा वित्त डेटा आणि पैसा मोठ्या रिस्कमध्ये टाकतो. कारण ते स्मार्टफोनवरील बँकिंगशी संबंधित अॅप्सवर मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन सोडते.

Advertisement

आणि हॅकर्सना माहिती पाठवते. ThreatFabric मधील अनेक संशोधकांनी निदर्शनास आणले आहे की लोकप्रिय अॅप्स जसे की QR कोड रीडर, डॉक्युमेंट स्कॅनर, फिटनेस मॉनिटर्स आणि क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म नेहमी सर्टिफाइड नसतात.

येथे काही ऍप्स ची लिस्ट दिली आहे 

टू फैक्टर ऑथेंटिकेटर (Two Factor Authenticator)
प्रोटेक्शन गार्ड (Protection Guard)
क्यूआर क्रिएटर स्कॅन (QR CreatorScanner)
मास्टर स्कॅन लाइव (Master Scanner Live)
क्यूआर स्कॅन 2021 (QR Scanner 2021)
पीडीएफ डॉक्यूमेंट स्कॅनर – स्कॅन टू पीडीएफ (PDF Document Scanner – Scan to PDF)
पीडीएफ स्कॅनर (PDF Document Scanner)
क्यूआर साचणार (QR Scanner)
क्रिप्टोट्रैकर (CryptoTracker)
जिम एंड फिटनेस ट्रेनर (Gym and Fitness Trainer)

Advertisement

हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की हॅकर्स चार प्रकारचे मालवेअर वापरत आहेत जे वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरतात. अॅप इन्स्टॉल होईपर्यंत मालवेअर निष्क्रिय राहतो, अॅप इन्स्टॉल झाल्यावर ते सक्रिय होते.

सर्वात सामान्य मालवेअर अनात्सा आहे, जो 200,000 Android वापरकर्त्यांनी डाउनलोड केला असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. हे “अ‍ॅडव्हान्स” बँकिंग ट्रोजन म्हणून नियुक्त केले आहे. संशोधकांना सापडलेल्या मालवेअरचे इतर तीन प्रकार म्हणजे एलियन, हायड्रा आणि एरमॅक. हे सर्व मालवेअर फॉर्म वापरकर्त्याद्वारे अॅप स्थापित करेपर्यंत सक्रिय नसतात. नंतर ऍक्टिव्ह होतात.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker