Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

राज्य सरकारविषयी जनतेमध्ये कोणतीही नाराजी नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Mhlive24 टीम, 13 डिसेंबर 2020 : महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

Advertisement

दिल्लीत भर थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

Advertisement

राज्य सरकारविषयी जनतेमध्ये कोणतीही नाराजी नाही. मात्र विरोधी पक्षामध्येच विरोधी हा शब्द आहे त्यामुळे त्यांना त्या शब्दाला जागावं लागतं.

Advertisement

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना ताब्यात घेण्यात विषयी आमच्या सरकारमधलं कुणीही काही बोललेलं नाही. देवेंद्र फडणवीस आम्हाला हे काही सुचवू पाहात आहेत का?

Advertisement

देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पक्षात कोण हवं आहे आणि कोण नकोय हे सुद्धा कळत नाही. प्रविण दरेकर यांना ताब्यात घेण्याबद्दल फडणवीसांकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी जरुर द्यावेत असाही टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li