डॉक्टरकडून महिलेने मागितली ६० लाख रुपयांची खंडणी

Mhlive24 टीम, 27 सप्टेंबर 2020 :- सातारा शहरात वास्तव्यास असलेल्या डॉक्टरांचे या खंडणी मागणार्‍या महिलेशी प्रेमसंबध जुळले आणि त्यानंतर अनेक वेळा दोघांचे व्हिडिओ कॉलवरून एकमेकांसोबत अश्‍लिल व्हिडिओ कॉलिंग झाले होते. 

अनेक वेळा असे व्हिडिओ कॉल सुरू असताना संबंधित महिलेने या व्हिडिओ कॉलचे स्क्रिनशॉट सेव्ह करून ठेवले होते. हे स्क्रिन शॉट व्हायरल करण्याची धमकी देत महिलेने त्या डॉक्टरला तब्बल 60 लाख रूपयांची खंडणी मागितली होती.

वारंवार ही महिला त्या डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन बदनामी करण्याची धमकी देत होती. या तडजोडीअंती 60 लाख रूपये देण्याचे संबंधित डॉक्टरने मान्य केले. त्यानुसार डॉक्टरने पहिला हफ्ता म्हणून 12 लाख रूपये त्या महिलेले दिले होते.

Advertisement

उर्वरित पैशांसाठी महिलेने डॉक्टरामागे तगादा लावला होता. या तगाद्याला कंटाळून अखेर डॉक्टरने शाहुपूरी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणीची उर्वरित रक्‍कम स्विकारताना महिलेला रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर तिने यापूर्वी डॉक्टरकडून खंडणी म्हणून 12 लाख रूपये घेतले असून पैशातून दागिने खरेदी केल्याचे सांगितले. हे दागिनेही पोलिसांनी जप्‍त केले आहेत. याबाबत पोलीस पुढील तपास करीत असून या महिलेने अजून किती जणांना फसवले आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker