बोटांचा वापर हा ही बलात्कार

MHLive24 टीम, 23 जुलै 2021 :- बलात्काराच्या व्याख्येनुसार लिंगाचा योनीत जबरदस्तीनं प्रवेश होणं अपेक्षित असतं; पण आरोपीनं केवळ बोटांचा वापर केल्यानं हे प्रकरण लैंगिक अत्याचार म्हणून चालवण्यात यावं अशी मागणी आरोपीनं केली; मात्र लिंगाऐवजी बोटांचा वापर हा देखील बलात्कारच असल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवून खालच्या न्यायालयानं दिलेली शिक्षा कायम ठेवली.

बलात्काराची व्याख्या व्यापक :- एखाद्या महिलेच्या योनीत बळबजबरीनं लिंग घालणं हाच केवळ बलात्कार ठरत नाही, तर योनीत बोटांचा वापर करणं हा ही बलात्कारच आहे, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदविलं आहे. एका गतिमंद मुलीच्या योनीत बोटाचा वापर केल्याप्रकरणात आरोपीची शिक्षा न्यायालयानं कायम केली आहे. आरोपीची याचिका फेटाळून लावली

काय घडलं ? :-  मुंबईतील मालाड येथे राहणा-या एका २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. एका ३३ वर्षीय तरुणावर हा आरोप आहे. आरोपी आणि पीडिता एकाच परिसरात राहतात. या तरुणानं पीडितेला जत्रेच्या निमित्तानं फिरायला नेऊन एका निर्जन स्थळी तिच्यासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र पीडिता रडायला लागल्याने तो घाबरला. तिला त्यानं घरी सोडले.

Advertisement

पीडितेनं आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. तिच्या कुटुंबीयांनी त्याच्या विरुद्ध बलात्काराची तक्रार केली. आरोपनिश्चितीनंतर त्याला बलात्कार आणि अपहरण प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. त्या शिक्षेला त्याने आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

काय म्हणाले उच्च न्यायालय ? :- बलात्काराचा आरोप काढून त्या ऐवजी लैंगिक अत्याचाराचा आरोप करावा, अशी मागणी आरोपीनं केली. या वेळी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले, की या प्रकरणात जरी लिंग आणि योनीचा संबंध आलेला नसला, तरीही पीडितेच्या अंतर्गत अवयवांना जखमा झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. याशिवाय तिच्यावर अत्याचार झाल्याचं सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडून जे न्यायवैद्यकीय पुरावे जमा झाले आहेत, ते आरोपीशी तंतोतंत जुळत आहेत. त्यामुळे बलात्काराचा आरोप रद्द करता येणार नाही.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker