कोरोनाची दुसरी लाट भोवली; घरांच्या विक्रीत 58 टक्के घट

MHLive24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- कोरोनाच्या च्या दुसऱ्या लाटेमुळे, एप्रिल-जून 2021 तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत 58 टक्क्यांनी घट झाली आहे. डेटा अॅनालिटिक्स कंपनी प्रॉपइक्विटीच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

टाळेबंदीमुळे घरांच्या विक्रीवर परिणाम :- आकडेवारीनुसार, एप्रिल-जून, 2021 या तिमाहीत निवासी मालमत्तांची विक्री 45 हजार 208 युनिट होती, जी आधीच्या तिमाहीत (जानेवारी-मार्च 2021) एक लाख आठ हजार 420 युनिट्स होती. एप्रिल आणि मे महिन्यात भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून विक्रीत 58 टक्क्यांची मोठी घट झाली आहे, असे प्रॉपइक्विटीने एका निवेदनात म्हटले आहे.

भारतातील प्रमुख शहरांमध्ये कडक टाळेबंदीमुळे घरांच्या विक्रीवर परिणाम झाला. कारण निवासी नोंदणी निलंबित करण्यात आली आणि गृह कर्ज वितरण मंद होते, म्हटले आहे.

Advertisement

दिल्ली एनसीआरमध्ये 43 टक्के घट :- बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई महानगर प्रदेश, दिल्ली-एनसीआर आणि पुणे येथे 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत घरांच्या विक्रीत 55 टक्के, 59 टक्के, 49 टक्के, 57 टक्के, 63 टक्के वाढ झाली आहे. 2021 च्या पहिल्या तिमाहीत अनुक्रमे 43 टक्के आणि 62 टक्के घट नोंदवण्यात आली.

तथापि, वार्षिक आधारावर, 2020 च्या याच कालावधीच्या तुलनेत या तिमाहीत विक्रीत वाढ दिसून आली. एप्रिल-जून 2021 तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमध्ये 45 हजार 208 युनिट्सची विक्री एप्रिल-जून 2020 मध्ये 29 हजार 942 युनिट्सच्या तुलनेत 51 टक्के जास्त होती.

एसबीआयकडून प्रक्रिया शुल्क माफ :- गृहकर्जाला गती देण्यासाठी, स्टेट बँकेने गृहकर्जासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. एसबीआयने गृहकर्जावर मान्सून धमाका ऑफर आणली आहे. याअंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत कर्ज घेतल्यास कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. गृहकर्जाच्या सुमारे 0.40 टक्के रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून जमा केली जाते. हे माफ केल्यास कर्जदारांना मोठा दिलासा मिळेल.

Advertisement

सर्वांत स्वस्त गृहकर्ज :- प्रक्रिया शुल्क माफी 19 जुलैपासून लागू करण्यात आली आहे. ती 31 ऑगस्टपर्यंत चालेल. एसबीआय सध्या देशात सर्वांत स्वस्त गृहकर्ज देत आहे. गृह कर्जाचा व्याजदर 6.70 टक्क्यांपासून सुरू होतो. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सीएस शेट्टी म्हणाले की, बँकेने मान्सून धमाका ऑफर सुरू केली आहे. प्रक्रिया शुल्क माफ केल्याने गृहकर्ज घेणाऱ्यांमध्ये उत्साह वाढेल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker