डेबिट कार्ड तथा डिटेल्स चोरीला गेल्यास काय केले पाहिजे याविषयी आरबीआयने केला ‘हा’ मोठा खुलासा

MHLive24 टीम, 26 जुलै 2021 :- आपण सर्वच जण आर्थिक व्यवहार करत असतो. आता सध्या कोरोनामुळे ऑनलाईन पेमेंट हस्तांतरनास जास्त प्राधान्य दिले जाते. आता सध्या सर्वच लोक जास्त कॅश खिशात ठेवत नाहीत. त्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अशी पेमेंट कार्ड वापरतात.

डेबिट कार्ड हे एक बँकेकडून मिळणारे कार्ड आहे जे आपल्या बँकेतील खात्याशी जोडलेले असते. हे कार्ड प्लास्टिकचे असते व ते आकाराने ८५.६० mm × 53.98 mm इतके असते. डेबिट कार्ड आपल्याला बँकेत खाते खोल्यावर आपणास हवे असल्यास बँके कडून प्राप्त होते.

तुम्ही आपले डेबिट कार्ड वापरुन एटीएममधून पैसे काढू शकता.दरम्यान टेक्नॉलॉजी वाढल्याने अनेक फसवणुकीचे प्रकारही घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) बँक खातेदारांना सुरक्षित व्यवहाराशी संबंधित टिप्स नेहमीच शेअर करत असते.

Advertisement

आरबीआयच्या ट्विटर हँडलद्वारे ग्राहकांना फसवणूकीस बळी पडण्यापासून कसे वाचता येईल याविषयी माहिती दिली जाते. आरबीआयच्या म्हणण्यानुसार जर बँक खातेधारकाचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड किंवा त्याचा तपशील चोरीला गेला किंवा हरवला गेला तर प्रथम कार्ड ब्लॉक करा.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, थोडी सावधगिरी बाळगल्यास ग्राहकांच्या बर्‍याच समस्या दूर होऊ शकतात. आपला पिन, ओटीपी किंवा बँक खात्याचा तपशील कधीही शेअर करू नका. जर आपले कार्ड किंवा त्याचे तपशील चोरीला गेले किंवा हरवले तर ताबडतोब कार्ड ब्लॉक करा.

सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांना हरवलेले किंवा चोरीलेले कार्ड किंवा इतर कोणत्याही कारणामुळे कार्ड ब्लॉक करण्यासाठी माध्यम प्रदान केले आहे. ग्राहक कॉल करू शकतात किंवा बँकेच्या अधिकृत मोबाइल फोन एप्लीकेशनद्वारे हे हाताळू शकतात.

Advertisement

याशिवाय तुम्ही एसएमएसद्वारेही हे करू शकता. इंटरनेट बँकिंगचा वापर करून ग्राहकही हे ऑनलाइन करू शकतात. म्हणजेच आपण बँकेत न जाता घरी बसून आपले कार्ड ब्लॉक करू शकता.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker