Electric Car : पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत.

ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत.

दरम्यान नामांकित कंपनी Tata आकर्षित EV वाहने लाँच करत आहे. अशातच टाटा मोटर्स आपल्या इलेक्ट्रिक कार देशात दिवसेंदिवस अपडेट करत आहे.

परवडणाऱ्या किमतीत इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्यासाठी कंपनी ओळखली जाते. पण आता टाटाने आपल्या दोन्ही लोकप्रिय इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत.

ज्या इलेक्ट्रिक कारच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे त्यात टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक आणि टाटा टिगोर ईव्ही यांचा समावेश आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Nexon Electric (Nexon EV) आणि Tigor EV च्या सर्व प्रकारांच्या किंमतीत 25,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Tata Nexon EV च्या कोणत्या मॉडेल्सच्या किमती वाढल्या: Tata ने देशातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या Tata Nexon EV मॉडेलच्या सर्व प्रकारांवर रु. 25,000 पर्यंत वाढ केली आहे. अशा परिस्थितीत आता Nexon EV च्या बेस मॉडेलची किंमत 14.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) झाली आहे.

ज्या मॉडेलची किंमत वाढली आहे, यामध्ये Tata Nexon EV XM, Tata Nexon EV XZ Plus, Tata Nexon EV XZ Plus Dark Edition, Tata Nexon ZX Plus Lux, Tata Nexon EV XZ Plus lux Dark Edition यांचा समावेश आहे.

Tata Tigor EV च्या कोणत्या मॉडेलची किंमत वाढली आहे: टाटाने त्यांच्या एकमेव इव्ह सेडान, टाटा टिगोरच्या किमतीत 25,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

या कारला ग्राहकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. अशा परिस्थितीत, आता Tata Tigor EV च्या बेस व्हेरिएंटची किंमत 12.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) झाली आहे.

या मॉडेलच्या ज्या प्रकारांची किंमत वाढली आहे त्यात Tata Tigor XE, Tata Tigor XM, Tata Tigor XZ Plus, Tata Tigor XZ Plus यांचा समावेश आहे.

Tata Nexon EV ची बॅटरी: Tata Nexon EV मध्ये कंपनीने 30.2kWh ची बॅटरी दिली आहे. या बॅटरीसोबत जोडलेली मोटर 128.7 bhp पॉवर आणि 245 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचा टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रति तास आहे.

Tata tigor EV ची बॅटरी: Tata Tigor EV मध्ये कंपनीने 26 kWh ची बॅटरी दिली आहे. या बॅटरीसोबत जोडलेली मोटर 74.7 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही कार 306 किमी पर्यंतची रेंज देते.