Expensive Tea : एक किलो चहाची किंमत ९९,९९९ रुपये; जाणून घ्या इतर काही खास गोष्टी

MHLive24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- आसामचा चहा जगभर प्रसिद्ध आहे. आता या आसामच्या चहाने लिलावाचे सर्व विक्रम मोडले आहेत. आसाममधील लिलावादरम्यान चहा प्रति किलो ९९,९९९ हजार रुपयांप्रमाणे विकला गेला.(Expensive Tea)

मनोहारी गोल्ड स्पेशॅलिटी टी हे या जगप्रसिद्ध चहाचे नाव आहे. कोरोना साथीच्या काळात गुवाहाटी टी ऑक्शन सेंटरने (जीटीएसी) चहाची विक्रमी भावाने विक्री केली.

ही मनोहारी गोल्ड टी हा चहा ९९,९९९  रुपये प्रति किलोग्रॅमच्या विक्रमी किंमतीवर विकला गेला आहे. गुवाहाटी चहा लिलाव केंद्राचे (GTAC) सचिव प्रियनुज दत्ता यांनी म्हटले आहे.

Advertisement

की मनोहारी चहा मळ्याने आपला मनोहारी गोल्ड हा चहा प्रकारातील एक किलोग्रॅम चहा सौरभ टी ट्रेडर्सला विकला आहे. ही किंमत देशातील चहाच्या विक्री आणि खरेदीतील, तसेच लिलावातील सर्वात मोठी किंमत आहे.

मनोहारी टी एस्टेटचे मालक राजन लोहियाने म्हटले आहे या प्रकारच्या खास प्रीमियम दर्जाच्या स्पेशल चहाची जागरुक ग्राहकांकडून आलेल्या मागणीच्या आधारावर उत्पादन करतो.

मागील वर्षी 50 हजार रुपये प्रतिकिलो विक्री झाली

Advertisement

विष्णू टी कंपनीने हा चहा खरेदी केला आहे. आता ही कंपनी आपल्या ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातून हा चहा विक्री करेल. साथीच्या रोगाच्या दरम्यान ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. या चहाच्या निर्मितीसाठी मनोहारी टी स्टेटने विशेष व्यवस्था केली होती.

गेल्या वर्षी ही चहा 50000 रुपये प्रति किलो विकला गेला होता. आसामचा खास चहा आपल्या खास चवीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या चहाची चव, सुगंध आणि रंग फारच आकर्षक आहे.

गेल्या वर्षी चहा विक्रीसंदर्भात दोन नवीन रेकॉर्ड करण्यात आले

Advertisement

गेल्या वर्षी 13 ऑगस्टला आसाममधील आणखी एक स्पेशल चहा 75000 रुपये प्रति किलोप्रमाणे विकला गेला. हा चहा डिकॉम टी इस्टेटने विकला होता. या चहाला गोल्डन बटरफ्लाय टी म्हणतात. या चहाला हे नाव देण्यात आले कारण चहा बनवण्यासाठी गोल्डेन टीप वापरली जाते. हे खूप मुलायम आहे.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker