Opportunity to buy a new car : नवीन कार घेण्यासाठी योग्य संधी ! मारुती ‘ह्या’ सर्व कारवर देतेय जबरदस्त डिस्काउंट; किती होणार फायदा ? पहा

MHLive24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- डिसेम्बर महिना सुरु आहे. आता 2021 साल संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. वर्षाच्या शेवटी अनेक वाहन कंपन्या खूप चांगल्या ऑफर्स देतात. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर या ऑफरमध्ये ते खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.(Opportunity to buy a new car)

देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी आपल्या कारवर मोठी सूट देत आहे. आज आम्ही काही सर्वोत्तम कार डीलबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात

मारुती अल्टो

Advertisement

मारुतीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक, असणाऱ्या अल्टोवर कंपनी भरपूर सूट देत आहे. कंपनी मारुती अल्टोच्या STD व्हेरिएंटवर या महिन्यात 20,000 रुपयांची रोख सूट देत आहे.

मारुती अल्टो खरेदी केल्यास एकूण 38 हजार रुपये वाचू शकतात. उर्वरित ट्रिम्सवर, तुम्ही रु. 30,000 ची कॅश डिस्काउंट, रु. 15,000 चे एक्सचेंज डिस्काउंट आणि रु. 3,000 कॉर्पोरेट बोनस मिळवू शकता.

मारुती एस-प्रेसो

Advertisement

मारुती सुझुकी डिसेंबर 2021 मध्ये S Preso च्या पेट्रोल आणि CNG BS6 प्रकारांवर 33,000 रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. पेट्रोल इंजिन मॉडेलमध्ये 15,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.

मारुती वॅगन आर

या कारच्या पेट्रोल आणि CNG व्हर्जनवर तुम्ही 33,000 रुपयांपर्यंतचे फायदे घेऊ शकता. यामध्ये कंपनी 20,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker