दवाखान्यात उपचार घेणा-या रुग्णांची संख्या नऊ महिन्यानंतर हजाराच्या आत

MHLive24 टीम, 28 जुलै 2021 :-  शहरातील केवळ ९१६ कोरोना रुग्णांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे नऊ महिन्यांच्या खंडानंतर आज पहिल्यांदाच इतकी कमी झाली आहे. याआधी तीन नोव्हेंबर २०२० ला शहरातील शहरातील ८८० रुग्ण उपचार घेत होते.

५४ हजारांपासून अडीच हजारापर्यंतचा प्रवास :- याशिवाय पुणे शहरातील एकूण सक्रिय (ॲक्विटव्ह) कोरोना रुग्णांची संख्या ही अडीच हजारांच्या आसपास आली आहे. दुसऱ्या लाटेत हीच संख्या ५४ हजारांवर गेली होती. सद्यःस्थितीत पुणे शहरात एकूण दोन हजार ६४२ सक्रिय कोरोना रुग्ण असून, यापैकी एक हजार ७२६ जण गृहविलगीकरणात आहेत.

उर्वरित ९१६ जण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. रुग्णांलयात उपचार घेत असलेल्या पुणे शहरातील दुसऱ्या लाटेतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी पहिल्यांदाच एक हजारांच्या आत आली आहे.

Advertisement

दररोज अहवाल :- जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने शहर व जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा दैनंदिन अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालात पुणे व पिंपरी चिंचवड शहर, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र, नगरपालिका क्षेत्र आणि कटक मंडळांच्या हद्दीतील रोजचे नवीन कोरोना रुग्ण, बरे झालेले रुग्ण, रुग्णालयांत उपचार घेत असलेले, गृहविलगीकरणातील रुग्ण आणि मृत्यू झालेल्या रुग्णांची क्षेत्रनिहाय आकडेवारी प्रसिद्ध केली जाते.

एक जूनपासून लाट ओसरण्यास सुरुवात :- राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० रोजी पुणे शहरात सापडला होता. तेव्हापासून डिसेंबर २०२० पर्यंत शहरात कोरोनाची पहिली लाट सुरू होती. जानेवारी आणि फेब्रुवारीतील पहिले दोन आठवडे, अशा एकूण सहा आठवड्यांच्या खंडानंतर शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली होती. ही दुसरी लाट ओसरण्यास एक जून पासून सुरवात झाली होती.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker