किर्लोस्कर बंधूतही भाऊबंदकीचा वाद

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :- मालमत्ता, जमीन, जुमला अशी वादाची अनेक कारणे असतात. फार संपत्ती नसलेल्यांचे जसे वाद होतात, तसेच गर्भश्रीमंतातही संपत्तीवरून वाद होतात. धीरूभाई अंबानी यांच्या नंतर मुकेश अंबानी-अनिल अंबानी यांच्यात शीतयुद्ध झाले. टाटा समूहात सायरस मिस्त्री-रतन टाटांत वाद झाले. रेमंडच्या विजयपंत सिंघानिया यांना त्यांच्या मुलानेच घराबाहेर काढले.

त्यावरून वाद सुरू असताना आता आणखी एका मराठमोळ्या कार्पोरेट घराण्यात संपत्तीवरून वाद सुरू झाला आहे. सामान्यांच्या वादाचा परिणाम फार होत नसतो; परंतु कार्पोरेट घराण्यातील वाद बाहेर आला, तर त्याचे भांडवली बाजारावर आणि एकूण गुंतवणुकीवरही परिणाम होत असतात.

अंबानी बंधू, टाटा-मिस्त्री यांच्यासह देशात अशा बड्या औद्योगिक घरांचे वाद नेहमीच चर्चेत असतात. आता देशात आणखी एका मोठ्या कॉर्पोरेट हाऊसचा (किर्लोस्कर कुटुंब) वादंग चव्हाट्यावर आला आहे. किर्लोस्कर उद्योग समूहाला 130 वर्षांचा इतिहास आणि वारसा आहे. संजय किर्लोस्कर यांच्या नेतृत्वात किर्लोस्कर ब्रदर्स लि ही कंपनी आहे.

Advertisement

त्यांचे भाऊ अतुल आणि राहुल यांच्याकडे चार कंपन्या आहेत. ते आता संजय यांच्या कंपन्या गिळंकृत करीत असल्याचा आरोप आहे. 130 वर्षांचा वारसा काढून घेऊन ते जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप संजय यांनी केला आहे. संजय यांचे आरोप त्यांच्या दोन्ही भावांनी फेटाळून लावले आहेत.

कुटुंबातील तीव्र मतभेदाच्या पार्श्वभूमीवर केबीएलने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाला (सेबी) पत्राद्वारे कळविले आहे, की किर्लोस्कर ऑईल इंजिन (कोएल), किर्लोस्कर इंडस्ट्रीज लि. (केआयएल), किर्लोस्कर वायवीय कंपनी (केपीसीएल) आणि किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लि. (केएफआयएल) ने केबीएलचा वारसा दडपण्याचा प्रयत्न केला आहे.

याशिवाय त्यांनी केबीएली मालकी त्यांची दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे सेबीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. या संदर्भात संपर्क साधला असता किर्लोस्कर इंडस्ट्रीज लि. च्या प्रवक्त्याने सांगितले, की केबीएलने सेबीला दिलेल्या पत्रात अनेक तथ्यपूर्ण त्रुटी आहेत. प्रवक्त्याने सांगितले, की संपूर्ण पत्रात केबीएलचा उल्लेख केलेला नाही. किर्लोस्कर ब्रदर्सचा वारसा हिसकावण्याचा प्रयत्न करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही.

Advertisement

या वर्षी 16 जुलैला अतुल आणि राहुल किर्लोस्कर यांच्या नेतृत्वात पाच कंपन्यांनी आपापल्या व्यवसायांसाठी नव्याने प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली होती. या कंपन्यांसाठी नवीन ब्रँडची ओळख आणि रंग जाहीर केले गेले, त्याचप्रमाणे नवीन किर्लोस्कर लोगोही स्वीकारला गेला. या घोषणेच्या वेळी असे म्हटले गेले होते, की हे रंग 130 वर्ष जुन्या नावाच्या वारशाचे प्रतिनिधित्व करतात.

130 वर्षांचा वारसा असल्याच्या संजय यांच्या म्हणण्याला दोन्ही भावांनी आक्षेप घेतला आहे. त्यासंबंधात केबीएलने सेबीला पत्र लिहिले आहे. पत्रात असे म्हटले आहे, की केओईल, केआयएल, केपीसीएल आणि केएफआयएलची अनुक्रमे २००९, १९७8,१97 4. आणि 1199 मध्ये स्थापना झाली आणि त्यांचा 130 वर्षांचा वारसा नाही. या पार्श्वभूमीवर आता सेबी कार्पोरेट घराण्याच्या या वादावर काय निर्णय देते ते पाहावे लागेल.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker