पाॅर्न फिल्मप्रकरणी चाैकशीसाठी सायबरतज्ज्ञांची मदत

MHLive24 टीम, 27 जुलै 2021 :-  अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणाची मुंबई गुन्हे शाखेतर्फे आणखी बऱ्याच जणांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. उद्योजक राज कुंद्रा आणि रेयान थोरपे यांच्याकडून अनेक महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि कागदपत्रंही छापेमारी दरम्यान सापडली आहेत. त्याची चौकशी केली जात असून सायबर विशेषज्ज्ञ आणि फॉरेन्सिक एक्स्पर्टची मदत घेतली जात आहे.

कुंद्रा आणि थोरपेची पुन्हा कोठडी मागणार :- अश्लील चित्रपट प्रकरणात राज कुंद्रा आणि रेयान थोरपे या दोघांची पुन्हा कोठडी मागितली जाणार आहे. गुन्हे शाखेच्या माहितीप्रमाणे अजूनही बऱ्याच तांत्रिक आणि आर्थिक मुद्द्यांवर या दोघांची चौकशी करणे बाकी आहे. त्यामुळे न्यायालयात गुन्हे शाखा दोघांच्या पुढील कोठडीची मागणी करणार आहे.

हायकोर्टात दोन याचिका :- मुंबई उच्च न्यायालयात राज कुंद्रा आणि रेयान थोरपे यांच्या अटकेविरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दोन्ही याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याचिकेत असं म्हटलं आहे, की राज कुंद्रा आणि रेयान या दोघांना 41 A ची नोटीस न देता अटक केली गेली आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. न्यायालयात काय निर्णय होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Advertisement

आर्थिक लेखापरीक्षकाची नेमणूक :- या प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल झालेली आहे. म्हणूनच मनी ट्रेलची (आर्थिक उलाढाल) चौकशी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेतर्फे अधिकृतपणे आर्थिक लेखापरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिकृत आर्थिक लेखा परीक्षक कंपनीची आर्थिक लेखाजोखा, कागदपत्रे, डेटा एंट्री, रोख प्रवाह, बॅलेन्स शीट आणि इतर आर्थिक बाजू तपासणार आहेत.

शिल्पा आणि राज कुंद्रामध्ये भांडण ! :- अश्लील चित्रपट रॅकेटच्या मुद्द्यावर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवण्यासाठी राज कुंद्राला पोलिस त्याच्या घरी घेऊन गेले होते, तेव्हा शिल्पा आणि राज कुंद्रा या दोघांमध्ये पोलिसांसमोरच जुंपली.

इतकी सगळी लफडी केली; पण मला काही कळू दिलं नाहीस, असं शिल्पा म्हणाली होती. एवढंच नव्हे, तर त्यानंतर रडत रडतच तिने स्टेटमेंट दिलं होतं. या प्रकरणी फेब्रुवारीमध्ये जेव्हा अश्लील चित्रपट प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता, तेव्हाही शिल्पा आणि राज कुंद्रामध्ये भांडण झालं होतं.

Advertisement

या प्रकरणामुळे शिल्पाची प्रतिमा फारच मलिन झाली असल्याची तिला खंत आहे. आतापर्यंतच्या तपासात यामध्ये शिल्पा शेट्टीचा सक्रिय सहभाग असल्याची माहिती समोर आलेली नाही, असे गुन्हे शाखेच्या सूत्रांची माहिती आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker