आनंदाची बातमी : या दिवसापासून रेस्टॉरंट उघडणार !

Mhlive24 टीम, 29 सप्टेंबर 2020 :- फिजिकल डिस्टन्सिंगसह कोरोनाचे सर्व नियम पाळून लवकरच आता हाॅटलिंगचा आनंद लुटता येणार आहे. मार्गदर्शक तत्त्वे अंतिम झाल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हाॅटेलिंगसाठी मुभा मिळणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी हाॅटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांना तसा शब्द दिला. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूरच्या हाॅटेल व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत दूर दृश्य प्रणालीव्दारे चर्चा केली.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोविडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने राज्याने काही पाउले टाकायला सुरुवात केली आहे. काही व्यवहार बंद ठेवल्याने कर रुपात शासनाला मिळणारा महसूलही बंद आहे.

Advertisement

त्यादृष्टीने रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी सुनिश्चित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात आली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर ही रेस्टॉरंटसाठीची रेसिपी असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

रेस्टॉरंट व्यावसायिकांची पुन्हा बैठक घेऊन एसओपी अंतfम करू असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर
Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker