Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

‘ह्या’ क्रिकेटर्सचे वडील होते कुली तर काहींचे हातगाडी चालक , रातोरात झाले करोडपती

Mhlive24 टीम, 1 ऑक्टोबर 2020 :-  जगातील सर्वात मोठी टी -20 क्रिकेट स्पर्धा आयपीएल आता जोरात सुरू आहे. कोरोना विषाणूमुळे युएईमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. असे म्हणतात की या स्पर्धेत केवळ पैशाची चमक असते. परंतु या स्पर्धेने अशा अनेक खेळाडूंना अत्यंत गरीबीत जगून क्रिकेट स्टार बनलेल्या खेळाडूंना यशाची कथा लिहिण्याची संधी दिली आहे. आयपीएलमुळे आज त्याच्याकडे कोटींची संपत्ती आहे. यात अनेक देशी व अनेक परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. रवींद्र जडेजा, ख्रिस गेल, यशस्वी जयस्वाल, नटराजन आणि मोहम्मद सिराज असे खेळाडू यात आहेत. जाणून घेऊयात त्यांविषयी 

Advertisement

१) यशस्वी जायसवाल

यशस्वी जयस्वाल हा खेळाडू यांपैकी एक. आयपीएलच्या 13 व्या मोसमाच्या लिलावात यशस्वी जयस्वालचा राजस्थान रॉयल्सने 2.40 कोटी रुपयांमध्ये त्याच्या संघात समावेश केला होता. यशवी जयस्वाल यांना जीवन जगण्यासाठी पाणी पुरी विकावी लागली आहे. तो उत्तर प्रदेशमधील भदोही येथील रहिवासी आहे. क्रिकेटमध्ये भविष्य घडवण्यासाठी तो मुंबईत आला, तेथे त्याला डेअरीमध्ये रात्र घालवावी लागली. मात्र, आज आयपीएलने या उगवत्या ठरायचे नशिब उजळवले आहे.

Advertisement

२) थंगारासू नटराजन

तमिळनाडूमधील थांगरसु नटराजनची आई आधी रस्त्याच्या कडेला एक स्टॉल लावायची, तर वडील रेल्वे स्थानकात कुली म्हणून काम करायचे. नटराजनने टेनिस बॉलने क्रिकेट खेळून आपल्या प्रवासाची सुरूवात केली, त्याच्या कठोर परिश्रमाने त्याला आयपीएलमध्ये आणले आहे. 2017 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला 3 कोटींमध्ये संघात समाविष्ट केले. सध्या नटराजन सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे.

Advertisement

३) मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराज याचे वडील ऑटो चालवत असत. प्रथम श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्याला आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने 2.6 कोटीमध्ये खरेदी केले होते. सध्या तो आरसीबीशी 2.6 कोटी रुपये घेऊन समाविष्ट झाला आहे.

Advertisement

४) रविंद्र जडेजा

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा यांचे आयुष्यही यापूर्वी खूप अडचणींनी भरले होते. जडेजाचे वडील पूर्वी एका खासगी कंपनीच्या सिक्योरिटीत काम करत होते. स्वत: जडेजा म्हणाले की, पूर्वी असे बरेच दिवस होते जेव्हा त्याने केवळ दहा रुपयांत दिवस काढले आहेत. कधी कधी पाणी विकत घेणेही कठीण होते. 2008-09 मध्ये त्याला राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. तो कोची टस्कर आणि गुजरात लायन्सकडूनही खेळला आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li