Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :-  संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच 50 हजार कोटींच नुकसान झाले आहे.

त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि केंद्र सरकारने सुद्धा राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्षामार्फत भरीव मदत महाराष्ट्राला द्यावी, मात्र मदत देण्याबाबत केंद्र सरकार हे पक्षपातीपणा करत आहे,

अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. केंद्र सरकारने मदत देताना आपली बाजू झटकू नये, तात्काळ राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्षामार्फत 35 हजार कोटींची मदत महाराष्ट्राला द्यावी. तसेच केंद्राने एन.डी.आर.एफ चे पथक लगेच राज्यात पाठवावे.

तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याआधी मागील वर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेकटरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती, आता तर ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी आता शेतकऱ्यांना हेकटरी 25 हजार रुपये मदत द्यावी.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही वारंवार आवाज उठवला आहे, अनेक आंदोलन उभे केले आहेत. मात्र ऊस तोडणी मजुरांसाठी पहिल्यांदाच आंदोलन करणाऱ्या नेत्यांचा नेमका हेतू कोणता आहे हे तपासणे गरजेचे आहे,

असे वक्तव्य करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर टीका केली. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, मात्र राज्यपाल कोषारी यांचं वर्तन आश्चर्य वाटणारे आहे.

कोषारी यांचे वर्तन त्या पदाला न शोभणारे आहे. पंतप्रधान मोदी यांच्या काळात घटनात्मक पदांच अवमूल्यन होत असुन ते लोकशाहीला घातक आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology