Mhlive24 टीम, 10 जानेवारी 2021:–देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरामध्ये बदल केले आहेत. 2 कोटींपेक्षा कमी ठेवींवर हे नवीन व्याजदर 8 जानेवारीपासून लागू झाले आहेत.
आता 1 पेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी अवधीच्या एफडीला 0.10% अधिक व्याज मिळेल. एसबीआयने यापूर्वी 10 सप्टेंबर 2020 रोजी एफडीवरील व्याज बदलले होते.
SBI मध्ये आता किती मिळेल व्याज ?
कालावधी नवीन व्याज दर (%) जुना व्याज दर(%)
7 ते 45 दिवस 2.90 2.90
46 ते 179 दिवस 3.90 3.90
180 ते 210 दिवस 4.40 4.40
211 ते 1 वर्षापेक्षा कमी 4.40 4.40
1 वर्षापेक्षा अधिक आणि 2 वर्षापेक्षा कमी 5.00 4.90
2 वर्षापेक्षा अधिक आणि 3 वर्षापेक्षा कमी 5.10 5.10
3 वर्षापेक्षा अधिक आणि 5 वर्षापेक्षा कमी 5.30 5.30
5 वर्षापेक्षा अधिक आणि 10 वर्षापेक्षा कमी 5.40 5.40
होम लोन देखील केले स्वस्त
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) गृह कर्जांवर मोठी सूट जाहीर केली आहे. लोक 31 मार्च 2021 पर्यंत गृह याचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय एसबीआयने गृह कर्जाच्या प्रक्रियेच्या शुल्कामध्ये 100 टक्के सूट जाहीर केली आहे.
सबीआयने गृह कर्जात 30 बेसिस पॉईंट किंवा 0.3 टक्के व्याज सवलत जाहीर केली आहे. याद्वारे, जर कोणी 31 मार्च 2021 पर्यंत एसबीआयकडून गृह कर्ज घेत असेल तर त्यांना गृह कर्जाच्या प्रक्रियेच्या शुल्कावर 100 टक्के सूट देखील दिली जाईल.
1 वर्षाच्या एफडीवर कोणती बँक किती व्याज देत आहे
बँक व्याज दर (%)
पंजाब नेशनल बँक 5.20
बँक ऑफ इंडिया 5.25
बँक ऑफ बड़ौदा 4.90
ICICI 4.90
HDFC 4.90
IDBI 5.00
यूनियन बँक 5.25
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर