इलेक्ट्रिक दुचाकींबाबत सरकारचा मोठा निर्णय, आता गाडीसह दर महिन्याला होईल लाखोंची कमाई

MHLive24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- इंधनाचे भाव गगनाला भिडत आहेत. पेट्रोल 110 रुपयांपर्यंत गेले आहे, तर डिझेल देखील शतकाचा टप्पा गाठणार आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे जनता त्रस्त आहे. दरम्यान, केंद्र सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी दुसरी पद्धत अवलंबली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने इलेक्ट्रिक आणि मिथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांना परमिट परवानाबाबत सूट देण्याची नोटीस जारी केली आहे. मंत्रालयाने 5 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, ‘रेंट ए कैब स्कीम’ आणि ‘रेंट ए मोटरसाइकिल स्कीम’ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

परमिटची आवश्यकता राहणार नाही :- सरकारच्या मते, इलेक्ट्रिक वाहनांसाठी परमिट घेण्याची गरज भासणार नाही. या योजना राबवण्यासाठी काही राज्ये पुढे आली आहेत. अधिसूचना जारी होताच, या वाहनांसह परमिट बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही. याचा अर्थ असा आहे की वाहने व्यावसायिकदृष्ट्या देखील वापरता येतील. सरकारच्या या निर्णयामुळे पर्यटन उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे.

Advertisement

भाड्याने देऊन होईल कमाई :- सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना परमिटमधून सूट दिली आहे. पण त्यात दुचाकींचा उल्लेख नव्हता. आता नव्या नोटीसमध्ये दुचाकींबाबत बोलण्यात आले आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक दुचाकी वाहने भाड्याने घेऊ शकतात. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या या निर्णयामुळे पर्यटन उद्योगाशी संबंधित लोकांना आर्थिक लाभ मिळतील. गोव्यासह अनेक ठिकाणांवर स्कूटर आणि बाईक प्रवासी भाड्याने घेतात. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढेल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker