Adani Group : केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अदानी समूह भरभराटीला आला आहे. समूहाकडून बरेच प्रोजेक्ट उपलब्ध झाले आहेत. अशातच अदानी समूहाचे शेअर्सदेखिल भरपूर प्रमाणात उसळी घेत आहेत.

अशातच अदानी ग्रुपचे शेअर देखिल भरपूर उसळी घेत आहे. अशातच अदानी समूह आणि फ्रेंच ऊर्जा क्षेत्रातील कंपनी टोटल एनर्जीने जगातील सर्वात मोठे ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टम तयार करण्यासाठी आणखी एक भागीदारी केली आहे.

अदानी एंटरप्रायझेसने स्टॉक एक्सचेंजला या धोरणात्मक युतीबद्दल माहिती दिली की TotalEnergies अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) कडून अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (ANIL) मधील 25% हिस्सा खरेदी करेल.

अदानी न्यू इंडस्ट्रीजने पुढील दशकात ग्रीन हायड्रोजन आणि संबंधित इकोसिस्टम्सच्या विकासासाठी $50 बिलियनपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात, ANIL 2030 पूर्वी दरवर्षी दहा लाख टन ग्रीन हायड्रोजन क्षमता विकसित करेल. देश सत्तर टक्क्यांहून अधिक विजेसाठी कोळशावर अवलंबून असताना, विजेसाठी भारताचे कोळशावरचे अवलंबित्व दूर करण्याचा अदानी यांचा प्रयत्न लक्षणीय आहे.

अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. अशा परस्थिती मध्ये अदानी ग्रूप कडून होणारी ही डील महत्वपूर्ण मानली जात आहे. सदर डील मुळे अदानी ग्रुपला मोठा फायदा होऊ शकतो.