file photo

Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :-  परतीच्या पावसाने राज्याला अक्षरश झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

उद्धव ठाकरे हे राज्यातले सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत. कोरोनामुळे एवढ्या लोकांचा बळी जात असताना आणि राज्यात पुराचा कहर सुरु असताना मुख्यमंत्री घरात बसून होते. आता ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, आता वेळ उलटून गेली आहे.

मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. नुकसान ग्रस्तांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील अनेक नेते दौरे करत आहे. प्रमुख नेते अशाप्रकारे सक्रिय झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कारभाराविषयी प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारभार करण्याच्या कार्यपद्धतीवर विरोधक पूर्वीपासूनच टीका करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे सध्या कोंडीत सापडले आहेत.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology