पूरग्रस्तांना तात़डीने दहा हजारांची मदत करणार

MHLive24 टीम, 26 जुलै 2021 :- राज्य सरकारने पूरग्रस्तांना तातडीने 10 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरडग्रस्तांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात महापुरामुळे घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकार तातडीने मदत करणार आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर घोषणा :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त चिपळूणची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी तातडीने मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर वडेट्टीवार यांनी मदितीची घोषणा केली.

Advertisement

एका वर्षाच्या आत पुनर्वसन :- “कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातलं आहे. या भागांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. दरडग्रस्तांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींचा संपूर्ण उपचार सरकार करेल.

तसेच ज्या नागरिकांच्या घरांना पुराचा फटका बसला आहे, अशा कुटुंबांना तातडीने 10 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे; पात्र लोकांची यादी महिन्याभरात तयार होईल.

जे बाधित आहेत त्यांना जमीन दिली जाईल. त्यांचं एका वर्षाच्या आत पुनर्वसनाचं काम केलं जाईल”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

Advertisement

शंभरापेक्षाही जास्त मृत्यू :- महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं. मुसळधार पावसामुळे राज्यातील आठपेक्षा जास्त ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या. यापैकी रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळीये गावाचे प्रचंड नुकसान झाले.

अख्ख्या गावावरच दरड कोसळल्याने संपूर्ण गाव जमीनदोस्त झाले. या दुर्घटनेत आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाले. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील आंबेघर गावात 15 तर मिरगावात 10 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसात अशा विविध घटनांमधून जवळपास शंभरपेक्षाही जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker