MhLive24 टीम , 22 जुलै 2020 : किरायेदार दाम्पत्याने नऊ वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक घटना नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रतापनगर भागात उघडकीस आली आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे. रामकिशन जांगिड (वय ४४) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
सरोज रामकिशन जांगिड (वय ४०, दोन्ही रा. शांतीविहार रेसिडेन्सी, दाते ले-आउट, सोनेगाव),असे रामकिशन याच्या पत्नीचे नाव आहे. पीडित ३८ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष म्हणजे, पतीपेक्षा पत्नीनेच समलैंगिक संबंध जोडून जास्त शारीरिक शोषण केल्याचे संबंधित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. त्यांचे कुकृत्य रोजचेच झाले. ती टाळाटाळ करीत असल्याचे पाहून जांगिडच्या पत्नीचा २४ जून २०२० ला तिला फोन आला.
तुझे सगळे कपडे घेऊन तू माझ्या घरी राहायला ये, असे तिने म्हटले. त्यानुसार, ती आरोपीच्या दाते ले-आऊटमधील घरी राहायला गेली. मात्र, सहा दिवसातच पती-पत्नीचे वर्तन बिघडले. आरोपी जांगिडने तिला पत्नीचा दर्जा देण्यास नकार दिला.
त्यामुळे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी आरोपी जांगिडने लग्न करण्यास नकार दिला आणि पती-पत्नीने तिला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन घराबाहेर हाकलून दिले. त्यामुळे ती पोलिसांकडे पोहचली.
लग्नाचे आमिष दाखवून तब्बल नऊ वर्षे पती-पत्नी दोघांनीही अत्याचार करून, समलैंगिक संबंध प्रस्थापित करून आपले जीवन उद्ध्वस्त केल्याची तक्रार तरुणीने प्रतापनगर ठाण्यात नोंदवली. त्यावरून पोलिसांनी जांगिड दाम्पत्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर
Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर