Tata Company Cars : भारत ही ऑटो सेक्टरची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशातील उत्पन्नाच्या दृष्टीने नविन दुचाकी क्षेत्र जितके मोठे आहे, तितकेच सेकंड हँड दुचाकींचे मार्केट जवळपास मोठे झाले आहे.

भारतीय लोक आपल्या बजेटनुसार लोक वेगवेगळ्या गाड्यांमध्ये रस दाखवतात. अशातच जर तुम्ही या महिन्यात कार घेण्याचा विचार करत असाल तर तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत.

अशातच तुम्ही या महिन्यात टाटा मोटर्सची कार घेण्याचा विचार करत असाल, तर थोडी प्रतीक्षा करा. वास्तविक, कंपनीने पुन्हा एकदा आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत.

या वर्षात कंपनीने कार महाग करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी जानेवारी 2022 आणि मार्च 2022 मध्येही कंपनीने कारच्या किमती वाढवल्या होत्या.

यावेळी किंमत 2.87% वाढली आहे. त्यामुळे टाटाच्या लोकप्रिय हॅचबॅक टियागो आणि सेडान टिगोर या गाड्या 15 हजार रुपयांनी महागल्या आहेत.

कंपनीने Nexon, Punch, Safari, Harrier आणि Altroz ​​च्या किंमती आधीच 1.1% ने वाढवल्या आहेत. टियागो आणि टिगोर 12,000 ते 15,000 रुपयांनी महाग टाटा मोटर्सने त्यांच्या सर्वात परवडणाऱ्या हॅचबॅक टियागो आणि लोकप्रिय सेडान टिगोरच्या किमतीत 12,000 ते 15,000 रुपयांची वाढ केली आहे.

कंपनीने या दोन्ही कारच्या CNG व्हेरियंटच्या किमतीतही समान रक्कम वाढवली आहे. Tigor पेट्रोल आणि CNG चे एकूण 11 प्रकार आहेत, यामध्ये XE, XM, XZ, XZ+, XZ + DT, XMA, XZA +, XZA + DT पेट्रोलचे प्रकार समाविष्ट आहेत.

त्याच वेळी, CNG मध्ये XZ, XZ+, XZ+ DT समाविष्ट आहे. दुसरीकडे, टियागोचे 15 प्रकार आहेत. यात पेट्रोलचे 10 प्रकार आणि सीएनजीचे 5 प्रकार आहेत.

Tata Tiago च्या नवीन किमती कंपनीने या कारचा बेस व्हेरियंट सर्वात महाग बनवला आहे. आता त्याचे बेस व्हेरिएंट XE खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 15,000 रुपये अधिक खर्च करावे लागतील.

यापूर्वी, त्याच्या पेट्रोल व्हेरिएंटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 522,900 रुपये होती, जी आता 537,900 रुपये झाली आहे. पेट्रोलच्या टॉप व्हेरिएंटची नवीन किंमत 732,900 रुपयांवर गेली आहे.

त्यात 12,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सीएनजी व्हेरियंटच्या बेस मॉडेल XE मध्ये 15,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

त्याची सुरुवातीची किंमत 612,900 रुपयांवरून 627,900 रुपयांपर्यंत वाढली आहे. सीएनजीच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 779,900 रुपयांवर गेली आहे.

टाटा टिगोरच्या नवीन किंमती कंपनीने टिगोरच्या बेस व्हेरिएंट XE वर 15,000 रुपयांची कमाल किंमत वाढवली आहे. पूर्वी त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 582,900 रुपये होती, जी आता 597,900 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे, पेट्रोलच्या टॉप व्हेरियंटसाठी आता 826,900 रुपये खर्च करावे लागतील.

कंपनीने त्यात 12,000 रुपयांची वाढ केली आहे. Tiago च्या CNG वेरिएंटबद्दल बोलायचे झाले तर आता त्याची सुरुवातीची किंमत 784,900 रुपये झाली आहे, जी पूर्वी 772,900 रुपये होती. त्याचप्रमाणे, त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 856,900 रुपये झाली आहे.

कच्च्या मालाच्या किमती वाढण्यामागे कंपनीचे म्हणणे आहे की, किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे कारच्या किमती वाढवणे आवश्यक होते. एकूण वाढीचा एक छोटासा भाग ग्राहकांना देण्यात आला आहे. वास्तविक, कारमध्ये वापरण्यात येणारा कच्चा माल सातत्याने महाग होत आहे.

त्यामुळे कंपन्यांना किमतीत वाढ करावी लागली आहे. केवळ टाटाच नाही तर देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी, ह्युंदाई, होंडा महिंद्रा अँड महिंद्रा, टोयोटा, मर्सिडीज बेंझ, ऑडी आणि व्होल्वो या कंपन्यांनीही दरात वाढ केली आहे.