हेलिकाॅप्टर घ्या; पण पूरग्रस्तांना वाचवाः मुख्यमंत्र्यांचे आदेश

MHLive24 टीम, 23 जुलै 2021 :- पुरात अडकेलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी लागेल ती सर्व मदत करा आणि आवश्यकता भासल्यास हेलिकॉप्टरचीही मदत घ्या, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

तात्काळ मदत पोचविण्याचे आदेश :- गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती उद्भवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला.

ठाणे आणि पालघर जिल्हाधिकारी तसेच ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून तात्काळ लागेल ती सर्व मदत पोहचवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Advertisement

जनजीवन विस्कळीत :- भिवंडी, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कर्जत, कसारा, खोपोली येथील पूरपरिस्थितीची माहिती ठाकरे यांनी घेतली. मुंबईसह ठाणे, वसई विरार, पालघर, कल्याण सर्वच भागात पूरपरिस्थिती उद्भवली आहे. पूर्व-पश्चिममधील काही भागात रस्ते वाहतूक ठप्प झाली.

मुसळधार पावसामुळे वालधुनी आणि उल्हास नदीच्या बाजूला असलेल्या परिसरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याणमध्ये काही भागात विद्युत पुरवठा खंडित आहे. पावसाचे पाणी वाढले असून विविध परिसरमध्ये असलेल्या सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker