सनी लिओनीने तिच्या नवीन गाण्याचा हा लूक सोशल मीडियावर केला शेअर ‘मराठी मुलीच्या ‘ रूपात दिसतीय खूप सुंदर !
Mhlive24 टीम, 13 डिसेंबर 2020 :–लवकरच सनी लिओनी तिच्या आगामी चित्रपटात ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव ‘ यात अर्जुन रामपाल सोबत दिसणार आहे. अलीकडेच तिने आपल्या नवीन गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल त्याचा आगामी चित्रपट ‘ द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव ‘ यामुळे खूप चर्चेत आहे. अलीकडेच अर्जुन रामपाल आणि सनी लिओनी त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसले. दरम्यान, अर्जुन रामपालने चित्रपटाचे पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.
अर्जुनने सांगितले, हा चित्रपट ऐतिहासिक कथेवर आधारित चित्रपट असून पुढील वर्षी 2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. अर्जुन रामपालसोबत सनी लिओन स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
अलीकडेच सनी लिओनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या चित्रपटातील गाण्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने ‘मराठी मुलीचा ‘ चा लुक केला आहे. या व्हिडिओमध्ये सनी लिओनी खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांना हा शेअर केलेला व्हिडिओ खूप आवडला आहे आणि ते कमेंटही करत आहेत.
सनी लिओनीने या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला असून त्यात तिने ‘हो आली री आली … मराठी मुलगी आली’ हा कॅप्शन लिहिला आहे. सनी लिओनीच्या या गाण्याला आतापर्यंत 1,123,345 लोकांनी पाहिले आहे. या गाण्यात सनीने जबरदस्त एक्स्प्रेशन दिले आहेत. हे गाणे गायिका श्रेया घोषालने म्हटले आहे.
‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात अर्जुन रामपाल आणि सनी लिओनी सोबत दिगंगना सूर्यवंशी आणि कृष्णा अभिषेक असणार आहेत.
सनी लिओनी सध्या ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटासोबतच ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरमादेवी’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात देखील दिसणार आहे. सनी लिओनीने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही शो बिग बॉस शोमधून केली होती.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर