आरोग्य संस्थेची भरती अचानक रद्द; उमेदवारांना मनस्ताप

MHLive24 टीम, 30 जुलै 2021 :-  ससून रूग्णालयातील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेची पदभरती एक दिवस आधी रद्द केल्याने उमेदवारांनी तीव्र संताप व्यक्त केला. बहुतेक उमेदवारांना भरती प्रक्रिया रद्द झाल्याची कल्पनाच नव्हती.

त्यामुळे गुरुवारी सकाळी भरती प्रक्रियेसाठी आलेल्या शेकडो उमेदवारांना बुधवारची (ता. २८) ‘नोटीस’ दाखविण्यात आली. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उमेदवारांनी संस्थेच्या कार्यालयात ठिय्या मांडला होता.

भरती रद्दचे मेल पाठविल्याचा दावा :- संस्थेच्या आस्थापनावरील विविध रिक्त पदे भरण्यासाठी विभागीय निवड समितीच्या वतीने १४ व १६ जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तिची मुलाखत व भरती प्रक्रिया गुरुवारी आयोजित करण्यात आली होती; मात्र शासन कारणास्तव बुधवारी (ता. २८) प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यासंबंधीचे ई-मेलही उमेदवारांना पाठविण्यात आल्याचे संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. नितीन अभिवंत यांनी सांगितले.

Advertisement

कार्यालयात ठिय्या :- भरतीच्या आदल्या दिवशीच प्रक्रिया रद्द का झाली, उमेदवारांना आधी का कळविण्यात आले नाही, असा आक्षेप घेत उमेदवारांनी घेतला. नागपूर, नाशिक, सातारा आदी राज्याच्या विविध भागातून उमेदवार आले होते. सकाळपासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत उमेदवारांनी डॉ. अभिवंत यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला होता. या वेळी सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिसांनीही हस्तक्षेप करत उमेदवारांची दखल घेतली.

ई-मेल आला नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे :- नागपूरहून सहाय्यक ग्रंथपाल पदासाठी आलेला शशिकांत केंद्रे म्हणतो,‘‘संस्थेने पाठविलेला ई-मेल मला प्राप्त झाला नाही. आज मुलाखत व भरती प्रक्रिया असल्याने पदरचे खर्च करून कोरोनाच्या स्थितीत मी नागपूरहून इथे आलो, तर सकाळी भरती रद्द झाल्याचे सांगण्यात आले.

आम्हाला या संबंधीचे स्पष्टीकरण हवे. यामुळे आम्हाला खूप मनस्ताप झाला आहे.’’ अचानक एक दिवस आधी भरती प्रक्रिया रद्द केल्याबद्दल उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. शेवटी डॉ. अभिवंत यांनी जबाबदारी घेत उमेदवारांना लेखी उत्तर दिले. त्यानंतर उमेदवार परतले.

Advertisement

भरती रद्द झाल्याची पूर्वसूचना नाही :- राज्यभरातून दीड-दोनशे उमेदवार इथे सकाळपासून दाखल झाले. त्यांना आधी कोणतीही पूर्वसूचना मिळाली नाही. अचानक ही भरती प्रक्रिया रद्द का केली, याचे समाधानकारक उत्तर प्रशासनाने तातडीने द्यायला हवे होते, असे छगन ढाकणे यांनी सांगितले.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker