पनवेलमध्ये जाळला आ.लाड यांचा पुतळा

MHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची केलेली भाषा शिवसेनेच्या जिव्हारी लागली असून, शिवसेना आक्रमक झाली आहे. पनवेलमधील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी कळंबोली शहरात लाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

जोरदार घोषणाबाजी :- वेळ आली तर शिवसेना भवन तोडू असे वक्तव केल्यानंतर लाड यांच्यावर टीका केली जात आहे. कळंबोली महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वात निदर्शनं करण्यात आली. शिवसेना शाखेपासून ते कारमेल शाळेच्या चौकापर्यंत रॅली काढत हा निषेध नोंदवण्यात आला. तसेच लाड यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

रस्त्यावर येण्याचे आव्हान :- पनवेल येथे शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान लाड यांच्याविरोधात जोरादार घोषणाबाजी करण्यात आली.

Advertisement

भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर असल्याने याचाच राग मनात धरून हे सर्व सुरू आहे. पाण्यातून मासा काढल्यावर तो जिवंत राहू शकत नाही, तशी भाजपची सत्तेतून दूर गेल्यावर परिस्थिती झालेली आहे. जे लोक जनतेतून निवडून येऊ शकत नाहीत असे लोक भाजपने आयात केले आहेत. प्रसाद लाड तुम्ही कोण तुम्हात ?

तुमची पार्श्वभूमी एकदा स्वतः तपासा. एकेकाळी तस्करी करणारी व्यक्ती, भूखंड घोटाळा करणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. अशा प्रकारची वक्तव्ये करण्यासाठी भाजपने त्यांना सोडले आहे,” अशा शब्दांत पनवेल शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी लाड यांच्यावर टीका केली.

लाड यांची काढली लायकी :- लाड यांची शिवसेनेवर टीका करण्याची लायकी नाही. प्रसाद लाड ट्विटरवर टिवटिव करण्यापेक्षा तुमच्यात हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा, असे आव्हानदेखील शेवाळे यांनी दिले.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker