Inspirational Story: प्रेरणादायी! 23 वर्षांच्या मुलाने प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून सुरु केला ‘हा’ व्यवसाय; आनंद महिंद्रा देखिल झालेत प्रभावित

MHLive24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- समाजात अनेक लोक स्वतःच्या मेहनतीवर खूप मोठे नाव कमावतात. काही अशा युनिक आयडिया वापरतात जेणेकरून ते मालामाल होतात. आता अशाच एका 23 वर्षीय भारतीय उद्योजकाची कहाणी प्रेरणादायी बनली आहे. हा उद्योजक म्हणजे आशय भावे आहे.(Inspirational Story)

तो जेव्हा बिझनेस स्कूलमध्ये होता तेव्हा त्याला एक कंपनी सुरू करण्याची कल्पना सुचली जी प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून स्नीकर्स बनवेल. त्याने त्याच्या स्टार्टअपचे नाव ठेवले ‘थैली’.

दरवर्षी वापरल्या जाणाऱ्या 100 अब्ज प्लास्टिक पिशव्यांच्या समस्येवर तोडगा काढणे हा कंपनीचा उद्देश होता. या प्लास्टिक पिशव्या दरवर्षी 1.2 करोड़ बॅरल तेल वापरतात आणि दरवर्षी 100,000 सागरी प्राणी मारतात.

Advertisement

स्वतः आनंद महिन्द्रा यांनी या स्टार्टअपबद्दल माहिती नसल्याची खंत व्यक्त केली 

नॉर्वेचे माजी मुत्सद्दी आणि मंत्री आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी पर्यावरण प्रमुख एरिक सोल्हेम यांच्या ट्विटवरून आनंद महिंद्रा यांना या सर्जनशीलतेची कल्पना आली. एरिक सोल्हेमने आपल्या ट्विटमध्ये ‘थैली’ आणि आशय यांच्या बिझनेस इनसाइडरचा व्हिडिओ शेअर केला आहे, तसेच स्टार्टअपचे कौतुक केले आहे.

आनंद महिंद्रा यांनी या स्टार्टअपची माहिती नसल्याची खंत व्यक्त केली. अशा स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आनंद महिंद्रा यांनी केवळ आशय यांच्या कंपनीने बनवलेल्या शूजची जोडी खरेदी करण्याचा निर्णय तर घेतलाच सोबत त्यांच्या स्टार्टअपला निधीही दिला.

Advertisement

कधी सुरू झाला हा स्टार्टअप

आशयने जुलै 2021 मध्ये ‘थैली’ हा स्टार्टअप सुरू केला. शूजची एक जोडी बनवण्यासाठी 12 प्लास्टिकच्या बाटल्या आणि 10 प्लास्टिक पिशव्या लागतात. शू बनवताना प्लॅस्टिक पिशव्या उष्णता आणि दाबाच्या मदतीने थालीटेक्स नावाच्या फॅब्रिकमध्ये बदलतात. नंतर ते शू पॅटर्नमध्ये कापले जाते.

फॅब्रिकमध्ये पुनर्वापर करता येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांना आरपीईटी असे नाव देण्यात आले आहे.
ते अस्तर, शूलेस, पॅकेजिंग आणि इतर भागांसाठी वापरले जातात. बुटाचा सोल रिसायकल केलेला रबर आहे. कंपनी 10 डॉलरच्या किमतीत हे शूज जगात कुठेही पाठवण्यास तयार आहे.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker