Business Idea :प्रत्येक व्यक्तीस आपले अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. यासाठी अनेकजण आपल्या परीने कष्ट करत असतात. आज आम्ही तुमच्या कष्टाला पंख देतील अशी एक कल्पना घेऊन आलो आहोत.

वास्तविक केंद्र आणि राज्य सरकारे वेळोवेळी विविध योजना राबवतात, ज्याचा उद्देश लोकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे हा आहे. प्रत्येक क्षेत्रात लोकांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

सरकारसुद्धा लोकांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. अशा अनेक योजना सरकारने बनवल्या आहेत ज्यामध्ये लोक त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकतात.

महाराष्ट्र शासनामार्फत कुक्कुटपालन योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सरकार कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी कर्ज देणार आहे. हे कर्ज तुम्हाला सरकारकडून सहज मिळेल. पोल्ट्री फार्म व्यवसाय करून लाखो कमवू शकता.

कुक्कुटपालनासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

मतदार ओळखपत्र

रेशन कार्ड

जमिनीची नोंद

अर्जदाराचे बँक तपशील

बँक स्टेटमेंट प्रत

प्रकल्प अहवाल

योजनेत सामील होण्याची पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्ती महाराष्ट्रातील असावी. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी जमीन असणे आवश्यक आहे आणि तुम्ही शेतकरी आहात तसेच संघटित आणि असंघटित क्षेत्रातील गट या योजनेत सामील होऊ शकतात. हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला कुक्कुटपालनाचा अनुभव असणे आवश्यक आहे.