गावात किंवा शहरात दोन्ही ठिकाणी भुईमुगाच्या शेंगापासून सुरु करता येईल ‘असा’ व्यवसाय; देईल बक्कळ कमाई, वाचा…

MHLive24 टीम, 06 जुलै 2021 :-  सध्या जगात मंदीची स्थिती आहे. जागतिक विकासदराबाबत अजूनही संभ्रम आहे. कधी काळी सातत्याने दोन आकडी विकासदर गाठणारा चीनही काही वर्षांपासून सहा ते सात टक्क्यांच्या दरम्यान विकासदर नोंदवत आहे. भारत देशाचीही परिस्थिती काही वेगळी नाही.

अनेक उद्योग व्यवसाय कोरोनाच्या संकटामुळे मोडून पडले आहेत. त्यामुळे अनेक लोक काम सोडून गावाकडे परतले आहेत. अशातच जर तुम्ही गावाकडेच एखादा चांगला व्यवसाय करू इच्छित असाल तर आपल्यासाठी भुईमुगाच्या शेंगापासून शेंगदाणे काढण्याचा पर्याय अत्यंत उत्तम आहे.

शेंगाचे टरफल काढून शेंगदाणे व तुकडे वेगळे करून विकणे हा एक लघू उद्योग होऊ शकतो. मोठी मागणी असेल तर शेंगदाण्याची प्रतवारी करण्याचे यंत्र वापरणे फायदेशीर ठरते. गृह उद्योगासाठी शेंगा फोडणी यंत्र मिळते, त्याची क्षमता ५० ते ६० किलो शेंगा फोडणी प्रति तास असते.

Advertisement

आठ तासांत साधारण चार क्विंटल शेंगा फोडल्या जाऊ शकतात. स्त्रियांना सहजपणे शेंगा फोडणी करता यावी म्हणून लहान क्षमतेचे (२५ ते ३० किलो शेंगा प्रति तास) शेंगा फोडणी यंत्र मिळते.

शेंगदाणे भाजून ते पॅक करून खाद्योपयोगासाठी विकता येतात. याचबरोबरीने खारे शेंगदाण्यासदेखील मागणी आहे. गुजरात राज्यात फक्त खारे शेंगदाणे तयार करण्याचे लघू उद्योग आहेत. त्याचप्रमाणे बेसन व तिखट, मीठ थोड्या पाण्यात कालवून शेंगदाण्यावर लावून तळल्यास तयार होणारा चविष्ट खमंग पदार्थही चांगला चालतो.

भाजलेल्या शेंगदाण्यापासून तयार होणारे गोड पदार्थ म्हणजे गूळ-शेंगदाण्याची चिक्की, गूळ-पापडी तसेच शेंगदाण्याचे लाडू. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी जास्त जागा, भांडवल इ. ची जास्तीची गरज नाही. हे सर्व पदार्थ बाजारात विकले जातात. गावातच चांगली प्रक्रिया पद्धती व यंत्रे वापरून चांगल्या गुणवत्तेचे खाद्यपदार्थ तयार व विक्री करून उत्पन्नाचे साधन तयार होऊ शकते. कच्चामालही गावातच मिळतो.

Advertisement

भुईमूग शेंगा फोडणी यंत्र :- हाताने भुईमूग शेंगा फोडणे हे काम कष्टाचे, खर्चाचे, वेळ घेणारे आणि मजुरांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. हे कष्टाचे व खर्चिक काम स्वस्त व सुलभ करण्याकरिता शेंगा फोडणी यंत्र विकसित केलेले आहे. यामुळे शेंगा फोडण्याचे काम लवकर होऊन वेळेची व खर्चाची बचत होते.

या यंत्राच्या रचनेत चार पाय असलेल्या एका लोखंडी पेटीत खालच्या बाजूस वक्राकार जाळी बसविलेली असते. पेटीच्या मध्यभागी फिरणाऱ्या दांड्यावर एक लांब हॅण्डल असतो. हॅण्डलच्या खालच्या टोकाला तीन खरबरीत लोखंडी ब्रश बसविलेले असतात.

वक्राकार जाळीत चार ते पाच किलो शेंगा टाकून हॅंडल पुढे-मागे हलविला, की जाळीवरच्या ब्रशखाली शेंगा भरडल्या जातात आणि शेंगा व टरफले अलग होऊन जाळीतून खाली पडतात. नंतर शेंगदाणे वेगळे करावे लागतात. शेंगांच्या आकारमानाप्रमाणे जाळी बदलता येते, शिवाय जाळी व ब्रश यातील अंतर कमी-जास्त करता येते.

Advertisement

यंत्राची वैशिष्ट्ये 

  • एका तासात एक मजूर सरासरी 60 ते 70 किलो शेंगा सहजपणे आणि जास्त श्रम न करता फोडू शकतो.
  • शेंगा फोडण्याचा वेग वाढल्यामुळे शेंगा वेळेत फोडून होतात, त्यामुळे वेळ, श्रम व पैसा वाचतो.
  • यंत्राने शेंगा फोडल्यास सहा ते आठ टक्के फूट होते; मात्र फुटीचे दाणे खाण्यायोग्य असतात.
  • यंत्रातून निघालेले पूर्ण शेंगदाणे बियाणे म्हणून वापरता येतात.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker