Special Bike : अबब ! ‘ही’ खास बाईक आली अन अवघ्या 120 सेकंदात सगळ्या विकल्या…

MHLive24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- Royal Enfield ने भारतात 650 Twins Anniversary Edition मधील 120 युनिट्स अवघ्या 120 सेकंदात विकून एक नवीन विक्रम केला आहे. इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल GT 650 ची ही एडिशन खास रॉयल एनफिल्डच्या 120 व्या वर्धापन दिनानिमित्त बनवण्यात आली आहे.(Special Bike)

देशातील आघाडीच्या जबरदस्त परफॉर्मेंस मोटरसायकल बनवणाऱ्या कंपनीने EICMA 2021 मध्ये Royal Enfield 650 Twin Anniversary Edition मॉडेल लाँच केले होते. त्याची फीचर्स जाणून घेऊया.

रॉयल एनफिल्डने केला विक्रम!

Advertisement

रॉयल एनफिल्डने जाहीर केले आहे की या स्पेशल एडिशन मोटरसायकलचे केवळ 480 युनिट्स जागतिक स्तरावर विकले जातील. यापैकी 120 युनिट्स भारतीय बाजारासाठी विक्रीसाठी ठेवण्यात आली होती, जी अवघ्या 120 सेकंदात विकली गेली.

रॉयल एनफिल्डचा दावा आहे की हे रेकॉर्ड वेळेत विकले गेले. Royal Enfield 650 Twin Anniversary Edition मोटरसायकल ग्राहकांना 6 डिसेंबर रोजी ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आली होती.

जबरदस्त फीचर्स असणारी बाइक

Advertisement

Royal Enfield Interceptor 650 आणि Continental GT 650 च्या 120 व्या आवृत्तीच्या मॉडेल्सना हँडक्राफ्ट, डाय-कास्ट ब्रास इंधन टाकी बॅज मिळतो. एवढेच नाही तर वाहनाला अधिक आकर्षक बनवण्यासाठी त्यांना हाताने रंगवलेल्या पिनस्ट्रीप्सही मिळतात.

याशिवाय, इंधन टाकीच्या टॉप बॅजमध्ये एक यूनिक सीरियल नंबर आणि साइड बॉडी पॅनलवर एक विशेष डेकल आहे.

रॉयल एनफिल्डच्या कामगिरीचा गौरवशाली इतिहास

Advertisement

नोव्हेंबर 1901 मध्ये रॉयल एनफिल्डने लंडनमधील स्टेनली सायकल शोमध्ये आपली पहिली मोटरसायकल लॉन्च केली होती. या वर्षी 120 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी, कंपनीने Royal Enfield Interceptor, Continental GT 650 120th Anniversary Edition डिझाइन आणि सादर केले आहे. त्यामुळे या मोटारसायकली विशेष बॅजिंग आणि विशेष लाइवरी सह येतात.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker