Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण !

Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना दुसऱ्यांना कोरोनाची लागण झालीय.

Advertisement

यापूर्वीही शंभरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी 19 फेब्रुवारी रोजी आढावा बैठक बोलविली होती.

Advertisement

मात्र बैठकीपुर्वीच त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना बैठक घेण्याचे सांगितले.

Advertisement

जास्त त्रास होऊ लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांना शहरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Advertisement

लक्षणे दिसत असल्याने जिल्हाधिकारी शंभरकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले.

Advertisement

त्यांच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती ठीक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव यांनी सांगितले.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement